पिंपरी-चिंचवड : इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम आता जागतिक पुरवठा साखळीवर दिसू लागला आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील उद्योग क्षेत्रालाही मोठा फटका बसत असल्याची माहिती लघुउद्योग संघटनांनी दिली आहे. शहरातील सुमारे सात ते आठ हजार सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग या परिस्थितीमुळे अडचणीत आले (War Impact Industries)आहेत.
आयात-निर्यात प्रक्रियेत निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे, कच्च्या मालाच्या दरवाढीमुळे आणि गॅस पुरवठ्यातील अनियमिततेमुळे उद्योगांची उत्पादन प्रक्रिया प्रभावित झाली आहे. परिणामी काही उद्योग बंद होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी उपाध्यक्ष संजय जगताप, सचिव जयंत कडू, माजी अध्यक्ष तात्या सपकाळ तसेच संचालक संजय सातव उपस्थित (War Impact Industries) होते.
कच्च्या मालाच्या दरवाढीमुळे उत्पादन खर्च वाढला
संदीप बेलसरे यांनी सांगितले की, युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या मालाच्या किंमती वाढल्या आहेत. निर्यातीसाठी तयार असलेला माल अनेक बंदरांमध्ये अडकून पडत असल्याने उद्योगांची पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. यामुळे उत्पादन प्रक्रिया अडथळ्यात येत असून उद्योगांवरील आर्थिक ताण वाढत आहे.तसेच वाहतूक खर्च आणि इंधन दरवाढ यामुळेही उद्योगांच्या अडचणी अधिक वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करून उद्योग क्षेत्राला दिलासा द्यावा, अशी मागणी उद्योग संघटनांकडून करण्यात आली (War Impact Industries) आहे.
धातू आणि गॅस पुरवठ्यावरही परिणाम
आयात होणाऱ्या अॅल्युमिनियम, कॉपर आणि ब्रास यांसारख्या धातूंच्या पुरवठ्यावरही या परिस्थितीचा परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेक उद्योगांमध्ये उत्पादनात घट झाल्याचे उद्योग प्रतिनिधींनी सांगितले.युद्धामुळे औद्योगिक कारखान्यांसाठी लागणाऱ्या एलपीजी गॅसच्या पुरवठ्यातही अडथळे निर्माण झाले आहेत. काही ठिकाणी गॅस कमी प्रमाणात उपलब्ध असून काही भागांत पुरवठा खंडित झाल्याची माहिती मिळत आहे.फॅब्रिकेशन, पावडर कोटिंग आणि सीडी कोटिंग यांसारख्या प्रक्रियांसाठी एलपीजी गॅसचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे गॅस पुरवठा कमी झाल्याने उत्पादन प्रक्रियेवर थेट परिणाम होत (War Impact Industries)आहे.
हजारो उद्योगांना दररोज कोट्यवधींचे नुकसान
पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील सुमारे सात ते आठ हजार सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना दररोज कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचे उद्योग संघटनांनी (War Impact Industries) सांगितले.
या परिस्थितीचा परिणाम उद्योग क्षेत्रासोबत रोजगारावरही होत असून परिस्थिती लवकर सुरळीत करण्यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी उद्योग संघटनांकडून करण्यात येत (War Impact Industries)आहे.
