Home गुन्हे Mahesh Landge Controversy:आ. महेश लांडगे यांच्या विधानावरून गुन्हा नोंदवून अटकेची मागणी; मुस्लिम समाज आक्रमक

Mahesh Landge Controversy:आ. महेश लांडगे यांच्या विधानावरून गुन्हा नोंदवून अटकेची मागणी; मुस्लिम समाज आक्रमक

पिंपरी-भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या कथित आक्षेपार्ह विधानावरून पिंपरी-चिंचवडमधील मुस्लिम समाजाने गुन्हा दाखल करून अटकेची मागणी केली. २५ पोलीस ठाण्यांत तक्रार अर्ज दाखल करण्याचा इशारा.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड, दि. ३ मार्च २०२६ (प्रतिनिधी – युनूस खतीब): पिंपरी-भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांनी अहिल्यानगर येथे मुस्लिम समाजाविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करत, त्यांच्याविरोधात तातडीने गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी पिंपरी-चिंचवड शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली (Mahesh Landge Controversy) आहे.

 

या पार्श्वभूमीवर पिंपरी येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत पुढील आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यात आली. दोन दिवसांपूर्वी अहिल्यानगर येथे ‘सकल हिंदू समाजा’च्या वतीने आयोजित मोर्चादरम्यान भाषण करताना आमदार लांडगे यांनी मुस्लिम समाजाबाबत कथितरीत्या आक्षेपार्ह व भडकाऊ विधान केल्याचा आरोप करण्यात आला (Mahesh Landge Controversy)आहे.

 

सदर वक्तव्य ‘हेट स्पीच’च्या स्वरूपाचे असून, पोलिसांनी स्वतःहून (सुओ मोटो) गुन्हा दाखल करणे अपेक्षित होते, असे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले. मात्र, ४८ तास उलटूनही कोणत्याही पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद न झाल्याने संताप व्यक्त करण्यात (Mahesh Landge Controversy)आला.

 

प्रशासनाकडून तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, शहरातील सर्व २५ पोलीस ठाण्यांमध्ये उद्यापासून तक्रार अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली जाणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात (Mahesh Landge Controversy)आली.

 

बैठकीस नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे राहुल डंबाळे यांच्यासह फजल भाई शेख, शाहाबुद्दीन शेख, हाजी युसुफ कुरेशी, रुहीनाज शकील शेख, नबील पानसरे, हाजी गुलाम रसूल, व्ही. एम. कबीर, जावेद शाह, सालार शेख, फिरोज तांबोळी, तोफिक मुल्ला, मोहसीन भालदार, इम्तियाज अत्तार, अब्दुल लतीफ सय्यद आदी उपस्थित (Mahesh Landge Controversy) होते.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00