Home माझं पिंपरी चिंचवड Opposition Leader:प्रशासन काळातील प्रकल्पांची चौकशी करा; डीपी आणि हरित सेतू प्रकल्प रद्द करा – भाऊसाहेब भोईर

Opposition Leader:प्रशासन काळातील प्रकल्पांची चौकशी करा; डीपी आणि हरित सेतू प्रकल्प रद्द करा – भाऊसाहेब भोईर

५० हजार हरकती असतील तर डीपी रद्द करा; प्रशासन काळातील सर्व प्रकल्पांची चौकशी करा – भाऊसाहेब भोईर

by Admin
Spread the love

पिंपरी (प्रतिनिधी) :पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत प्रशासन काळात राबविण्यात आलेल्या मोठ्या प्रकल्पांची प्राधान्याने चौकशी झाली पाहिजे. तब्बल ५० हजार नागरिकांनी हरकती नोंदविल्या असतील, तर विकास आराखडा (डीपी) रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागेल. रस्ते अरुंद करणारा तथाकथित हरित सेतू प्रकल्प तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी ठाम भूमिका विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी (Opposition Leader) मांडली.

मनपा प्रशासनाने अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी नेमकी कोणती पावले उचलली, पाणी गळती व पाणीचोरी थांबवण्यासाठी काय उपाययोजना केल्या, याची सविस्तर माहिती नागरिकांना द्यावी, अशी मागणीही त्यांनी(Opposition Leader) केली.

महापौर रवी लांडगे यांनी शहरात २४ तास पाणीपुरवठा सुरू करण्याचे दिलेले आश्वासन स्वागतार्ह असून, त्यांच्या या भूमिकेशी आपण पूर्णतः सहमत आहोत, असे स्पष्ट करताना भोईर म्हणाले, “मी विरोधी पक्षनेता असलो, तरी केवळ विरोधासाठी विरोध करणार नाही. सत्ताधारी, विरोधक आणि नागरिक यांच्यात समन्वयकाची भूमिका बजावत शहराच्या हितासाठी काम करणार (Opposition Leader)आहे.”

सोमवारी मनपा मुख्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना भोईर यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली. “राज्य सरकारमध्ये आम्ही महायुतीत सत्तेत आहोत; मात्र शहराच्या पातळीवर सक्षम विरोधक म्हणून सत्ताधाऱ्यांशी संवाद साधून विकासासाठी काम करू. काही अधिकारी निविदा प्रक्रिया विशिष्ट ठेकेदारांना लाभ होईल अशा पद्धतीने राबवतात. तर काही अधिकारी आपणच मनपाचे मालक असल्यासारखे वागत आहेत,” असा आरोप त्यांनी (Opposition Leader)केला.

शहरातील अनेक भागांत आजही नागरिकांना टँकरद्वारे पाणी घ्यावे लागत आहे. याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित करत त्यांनी सांगितले की, वारंवार वाढविल्या जाणाऱ्या निविदांमुळे मनपाच्या तिजोरीची खुलेआम लूट सुरू आहे. हीच परिस्थिती कायम राहिली, तर भविष्यात कामगारांचे पगार देण्यासाठी मनपाला राज्य सरकारकडे हात पसरावे लागतील. त्यामुळे मनपाची आर्थिक घडी तातडीने सावरावी लागेल. प्रशासन काळात झालेल्या सर्व बेकायदेशीर कामांची चौकशी केली जाईल, असा इशाराही त्यांनी (Opposition Leader) दिला.

हॉकर झोनचा प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडवणे आवश्यक असून, शहराच्या हद्दीत येणाऱ्या तलाठी कार्यालय, सर्कल ऑफिस, तहसील कार्यालय, पोलिस स्टेशन, पोलिस आयुक्तालय तसेच केंद्र व राज्य सरकारच्या सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांवर मनपाचा प्रभाव असला पाहिजे. नागरिकांची कामे वेळेत झाली पाहिजेत आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे, असे त्यांनी नमूद (Opposition Leader)केले.

नदी सुधार योजनेच्या नावाखाली नद्यांची गटारे झाली असून, पर्यावरणाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. आता राज्यकर्त्यांनी भानावर येण्याची गरज असून, चुकीच्या कामांवर बोट ठेवत एक सक्षम आणि जागरूक विरोधी पक्षनेते म्हणून काम करणार असल्याची ग्वाही भाऊसाहेब भोईर यांनी (Opposition Leader)दिली.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00