कार्यक्रमात “दिल दिया है जान भी देंगे”, “जय जय महाराष्ट्र माझा”, “शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती”, “संदेसे आते हैं”, “मेरा रंग दे बसंती चोला”, “वंदे मातरम्”, “मेरे देश की धरती”, “ऐ वतन ऐ वतन” यांसारख्या लोकप्रिय हिंदी व मराठी देशभक्तीपर गीतांनी परिसरात देशप्रेमाचे भारलेले वातावरण निर्माण (PCMC Republic Day) झाले.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी प्रजासत्ताक दिनाचे ऐतिहासिक व राष्ट्रीय महत्त्व विशद केले. तसेच स्वच्छ सर्वेक्षण २०२६ संदर्भात माहिती देताना पिंपरी-चिंचवड शहराने राज्यात मिळवलेला पहिला क्रमांक कायम राखत देशपातळीवर प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.तर विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी २६ जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिन व भारतीय संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले. यासोबतच राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी १४ ते २८ जानेवारी या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या मराठी भाषा संवर्धन पंधरवडा संदर्भात माहिती देताना मराठी भाषेचा दैनंदिन वापर वाढवणे, तिचे जतन व संवर्धन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद (PCMC Republic Day) केले.
या कार्यक्रमाचे नियोजन महापालिकेचे सहशहर अभियंता मनोज सेठीया यांनी केले होते. तर गफार मोमीन, आशिष देशमुख, प्रग्या गौरकर, अमित दीक्षित, प्रकाश सोळंकी, किरण अंदुरे यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. स्वराज म्युझिक बँडच्या नऊ प्रतिभावान वादकांनी उत्कृष्ट साथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी (PCMC Republic Day) केले.
