Home माझं पिंपरी चिंचवड Pcmc Candidate List:भाजपची पहिली उमेदवार यादी रविवारी प्रसिद्ध होणार – आमदार शंकर जगताप

Pcmc Candidate List:भाजपची पहिली उमेदवार यादी रविवारी प्रसिद्ध होणार – आमदार शंकर जगताप

निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही – शंकर जगताप

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची अंतिम यादी प्रदेश कार्यालयाकडे सादर करण्यात आली असून, उमेदवारांची पहिली यादी रविवारी (दि. २८) जाहीर होणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड निवडणूक प्रचार प्रमुख आमदार शंकर जगताप यांनी शुक्रवारी (दि. २६) (Pcmc Candidate List) दिली.

आमदार शंकर जगताप म्हणाले की, महापालिका निवडणुकीसाठी भाजपची उमेदवार यादी तयार असून ती प्रदेश कार्यालयाकडे पाठविण्यात आली आहे. मुंबई येथे झालेल्या बैठकीत या यादीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला पक्षाच्या कोअर कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते. विधानसभा निहाय उमेदवारांचा आढावा घेण्यात आला असून, काही प्रभागांतील उमेदवारांच्या नावांना प्राथमिक मान्यता देण्यात आली आहे. मात्र अंतिम निर्णय हा पक्षश्रेष्ठींचाच असणार असून प्रदेश व कोअर कमिटी याबाबत अंतिम शिक्कामोर्तब करणार (Pcmc Candidate List)आहे.

भाजप हा विकासाचे स्पष्ट व्हिजन घेऊन काम करणारा पक्ष असून, विरोधक कितीही एकत्र आले तरी त्याचा पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपच्या उमेदवारांचा विजय निश्चित असून पक्षामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय देण्याची परंपरा आहे. त्यामुळे उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर कोणत्याही प्रभागात नाराजी दिसून येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट (Pcmc Candidate List) केले.

भारतीय जनता पक्ष हा जगातील सर्वाधिक सदस्यसंख्या असलेला पक्ष आहे. विकासाचे व्हिजन घेऊन काम करण्याची इच्छा असणाऱ्यांचे पक्षात स्वागतच केले जाते, असे सांगत आमदार जगताप यांनी कार्यकर्त्यांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यकर्त्यांच्या बळावरच कोणतीही निवडणूक जिंकली जाते आणि त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, याची काळजी पक्षश्रेष्ठी घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्वेक्षणाच्या आधारे ज्या उमेदवारांमध्ये विजयाची क्षमता आहे, अशांनाच उमेदवारी देणे ही भाजपची रणनीती असल्याचेही त्यांनी (Pcmc Candidate List) सांगितले.

थम्पिंग मेजॉरिटी’ने भाजप विजयी होईल

“प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि मग आपण” या विचारसरणीवर भारतीय जनता पक्षाचे काम आधारित आहे. पक्षाचा आदेश हाच अंतिम मानून प्रत्येक कार्यकर्ता काम करत असतो. उमेदवारी जाहीर होईपर्यंत काही प्रमाणात नाराजी असू शकते; मात्र एकदा पक्षाचा निर्णय झाला की सर्वजण एकदिलाने कामाला लागतात, असे आमदार जगताप( Pcmc Candidate List)म्हणाले.

सध्या भाजपकडे इलेक्टिव्ह मेरिट असलेले मोठ्या संख्येने उमेदवार असून, त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप ‘थम्पिंग मेजॉरिटी’ने विजयी होईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त( Pcmc Candidate List)केला.

उमेदवारांची पहिली यादी रविवारी (दि. २८) जाहीर होणार असून, त्यानंतर सर्व कार्यकर्ते एक विचाराने, एक दिलाने काम करत पिंपरी-चिंचवड महापालिकेत कमळ फुलवतील, असा विश्वास आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त (Pcmc Candidate List) केला.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00