Home माझं पिंपरी चिंचवड Online Kavi Sammelan:कर्मयोगिनी महिला संस्थेतर्फे वंदे मातरम् काव्य स्पर्धा आणि ऑनलाइन काव्य संमेलन संपन्न

Online Kavi Sammelan:कर्मयोगिनी महिला संस्थेतर्फे वंदे मातरम् काव्य स्पर्धा आणि ऑनलाइन काव्य संमेलन संपन्न

वंदे मातरम् हा प्रेरणादायी मंत्र आहे, असे प्रतिपादन कवी संमेलनाचे अध्यक्ष सिताराम नरके यांनी केले.

by Admin
Spread the love

कार्यक्रमाची सुरुवात कवी अमिता जोशी यांनी हृदयस्पर्शी भावनेने सादर केलेल्या वंदे मातरम् या गीताने झाली. या मंगलारंभी संपूर्ण संमेलनात देशभक्तीची ऊर्जा पसरली.या कवी संमेलनाचे अध्यक्षस्थान राष्ट्रपती पारितोषिक विजेते, ज्येष्ठ कवी व लेखक मा. सिताराम नरके यांनी भूषविले. कार्यक्रमाला सन्माननीय अतिथी म्हणून मा. निलिमा फाटक यांची उपस्थिती (Online Kavi Sammelan) लाभली.

सर्व सहभागी कवींच्या कविता, सादरीकरण, आशय आणि मांडणी यांचे सखोल आणि सौंदर्यपूर्ण परीक्षण मा. निलिमा फाटक यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे कवींचा आत्मविश्वास वाढला आणि साहित्यिक दृष्टिकोन (Online Kavi Sammelan) अधिक समृद्ध झाला.

कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्ष मा. सिताराम नरके यांनी काव्य, राष्ट्रभावना आणि भाषिक संस्कृतीविषयी प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले. सर्व कवींच्या सर्जनशीलतेचे कौतुक करून साहित्यिक उपक्रम अधिक जोमाने राबवण्याचे आवाहन त्यांनी (Online Kavi Sammelan) केले.

स्पर्धेतील विजेते:
प्रथम क्रमांक – मंजुषा थावरे
द्वितीय क्रमांक (सामायिक) – प्राची देशपांडे आणि  (Online Kavi Sammelan)सूर्यकांत भोसले

सहभागी कवी:
सूर्यकांत भोसले, श्रद्धा चटप, नागेश गव्हाड, सुलभा सत्तुरवार, रजनी दुवेदी, प्राची देशपांडे, मंजुषा थावरे, प्रतिमा काळे, स्नेहा पाठक, वंदना इन्नानी, कांचन मुन, राहुल भोसले, अमिता जोशी, योगीता कोठेकर, उमा लुकडे, लक्ष्मीदेवी रेड्डी.या सर्व कवींनी आपल्या देशभक्तीपर रचनांद्वारे  (Online Kavi Sammelan)कार्यक्रमाची शोभा वाढवली.

सीमा शिरीष गांधी यांचे आकर्षक सूत्रसंचालन आणि प्रभावी प्रास्ताविक संमेलनाचे वैशिष्ट्य ठरले.
देशभक्तीच्या जयघोषात कार्यक्रमाची सांगता (Online Kavi Sammelan) झाली.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00