Home महाराष्ट्र Pimpri Chinchwad Ganesh Visarjan: प्राधिकरणात लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप

Pimpri Chinchwad Ganesh Visarjan: प्राधिकरणात लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप

पिंपरी-चिंचवडमध्ये अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन; निगडी प्राधिकरणातील गणेश तलावावर भाविकांची गर्दी, ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात बाप्पाला निरोप.

by Admin
Spread the love

(पिंपरी-चिंचवड) : तमाम भारतीयांचे लाडके दैवत असलेल्या गणपती बाप्पाला अनंत चतुर्दशीच्या दिवशी भक्तिमय आणि भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. दहा दिवस भक्तांच्या घरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये मुक्काम करून भक्ती, उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण करणारा बाप्पा लळा लावून पुन्हा आपल्या गावाला परतला. त्यामुळे गणेशभक्तांच्या डोळ्यांत विरहाचे अश्रू आणि ओठांवर ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष, असे भावनिक चित्र शहरभर पाहायला (Pimpri Chinchwad Ganesh Visarjan)मिळाले.

 

पिंपरी-चिंचवड शहरात ठिकठिकाणी गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. निगडी प्राधिकरण परिसरातील गणेशभक्तांनीही मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात लाडक्या बाप्पाला निरोप (Pimpri Chinchwad Ganesh Visarjan)दिला.

 

प्राधिकरण येथील गणेश तलाव परिसरात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहकार्याने गणेश विसर्जनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. नगरसेवक राजू मिसाळ, नगरसेवक अमित गावडे, उपमहापौर शर्मिला बाबर आणि ज्येष्ठ नगरसेविका शैलजा मोरे यांच्या माध्यमातून भाविकांसाठी विसर्जनाची व्यवस्था करण्यात (Pimpri Chinchwad Ganesh Visarjan)आली.

 

प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही निगडी प्राधिकरण परिसरातील नागरिकांनी मोठ्या श्रद्धेने गणरायाला निरोप दिला. बाप्पाच्या आगमनावेळी दिसलेला उत्साह विसर्जनाच्या वेळीही कायम होता. गणेश तलाव परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून (Pimpri Chinchwad Ganesh Visarjan)गेला.

 

विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भाविकांची सुरक्षितता आणि विसर्जन प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाकडून आवश्यक नियोजन करण्यात आले (Pimpri Chinchwad Ganesh Visarjan)होते.

दहा दिवसांच्या भक्तिमय सहवासानंतर बाप्पाला निरोप देताना प्रत्येकाच्या मनात एकच भावना होती—‘बाप्पा, आता निरोप घेतोय… पण पुढच्या वर्षी पुन्हा याच उत्साहाने, याच प्रेमाने तुझी वाट(Pimpri Chinchwad Ganesh Visarjan) पाहू!’


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00