(पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी ): शहरातील वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांची धडक मोहीम सुरू आहे. सन २०२६ मध्ये आतापर्यंत ५ लाख ७२ हजार १८ कारवाया करण्यात आल्या असून, त्यातून ६३ कोटी ७८ लाख ४७ हजार ६५० रुपयांचा दंड आकारण्यात आला (PCMC Traffic Police)आहे.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार, पोलीस सहआयुक्त शशिकांत महावरकर आणि अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेकडून ही कारवाई करण्यात येत (PCMC Traffic Police)आहे.
कारवाईमध्ये विनाहेल्मेट वाहन चालविणाऱ्या ७२ हजार १२३, फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या ५३ हजार ८४०, काळ्या काचा वापरणाऱ्या २७ हजार ५९७ आणि मॉडिफाईड सायलेन्सर असलेल्या १० हजार २०३ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली(PCMC Traffic Police) आहे.
तसेच, विधानसभा सदस्य, आमदार आणि अशोकस्तंभाचा लोगो अनधिकृतपणे वापरणाऱ्या वाहनांवरही भारतीय न्याय संहिता व मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. संबंधित वाहनांचे परवाने निलंबित करण्याबाबतचे प्रस्ताव नियमानुसार पाठविण्यात येणार (PCMC Traffic Police)आहेत.
वाहतूक नियमभंगाविरोधातील कारवाई यापुढेही सुरू राहणार असून, नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे. वाहतूक कोंडी किंवा अन्य समस्या पोलिसांच्या निदर्शनास आणण्यासाठी ‘ट्रॅफिक बडी’ व्हॉट्सअॅप चॅटबॉट ८७८८६४९८८५ वर माहिती देण्याचे आवाहनही करण्यात आले (PCMC Traffic Police)आहे.
