Home आरोग्य Pimpri Chinchwad crematorium:स्मशानभूमींच्या दुरवस्थेवर शैलजा मोरेंचा ‘ऑन ग्राउंड’ पाहणी दौरा

Pimpri Chinchwad crematorium:स्मशानभूमींच्या दुरवस्थेवर शैलजा मोरेंचा ‘ऑन ग्राउंड’ पाहणी दौरा

निगडी, किवळे, मामुर्डी, चिंचवड-केशवनगर आणि देहूरोड स्मशानभूमींच्या दुरवस्थेची शैलजा मोरे यांनी पाहणी केली. मूलभूत सुविधांच्या अभावावर प्रशासनाला जाब.

by Admin
Spread the love

(पिंपरी, ता. ८, सप्टेंबर 2026): मृत्यूनंतर नागरिकांना सन्मानपूर्वक अंत्यविधीची सुविधा मिळावी, यासाठी आवश्यक असलेल्या स्मशानभूमींचीच दुरवस्था झाल्याचे धक्कादायक चित्र माजी उपमहापौर तथा नगरसेविका शैलजाताई मोरे यांच्या पाहणीत समोर आले. निगडी, किवळे, मामुर्डी, चिंचवड-केशवनगर आणि देहूरोड-शितळानगर येथील स्मशानभूमींना भेट देत त्यांनी तेथील समस्या जाणून घेत प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित(Pimpri Chinchwad crematorium) केले.

 

स्मशानभूमींमधील गैरसोयींचा मुद्दा नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मोरे यांनी उपस्थित केला होता. प्रशासनाकडून समाधानकारक कार्यवाही न झाल्याने त्यांनी मंगळवारी (दि. ८) प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. यावेळी नागरिक व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून समस्या जाणून घेत त्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. यावेळी नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे आणि नगरसेवक सुरेश भोईर उपस्थित (Pimpri Chinchwad crematorium)होते.

 

निगडी : विद्युत दाहिनीच्या छताला गळती, पिण्याचे पाणी नाही

 

निगडी स्मशानभूमीत विद्युत दाहिनीच्या छताला गळती असून, खिडक्यांतून पावसाचे पाणी येते. सुरक्षा भिंत, पेव्हिंग ब्लॉक, पिण्याचे पाणी, अस्थी ठेवण्यासाठी कलश, स्वच्छता आणि प्रकाशाची सुविधा अपुरी आहे. जनरेटरजवळ पाणी साचते, पाईप फुटलेला आहे. विद्युत दाहिनीतील ट्रॉलीवरून मृतदेह खाली पडण्याचा धोका आहे. कर्मचाऱ्यांना सुरक्षा किट, मास्क व गणवेश उपलब्ध नाहीत. २६ वर्षे सेवा करूनही काही कर्मचारी कायमस्वरूपी नसल्याचा मुद्दाही मोरे यांनी उपस्थित (Pimpri Chinchwad crematorium) केला.

 

किवळे : स्वच्छतागृह, पाणी आणि प्रकाशव्यवस्थेचा अभाव

 

किवळे येथील नदीकाठच्या स्मशानभूमीत स्वच्छतागृह, चेंजिंग रूम, पिण्याचे पाणी, सभामंडप, स्पीकर, माईक आणि पुरेशी प्रकाशव्यवस्था नाही. परिसरात गवत व कचरा वाढला असून, पत्राशेड वाकले आहे. नदीकाठच्या भागात पेव्हिंग ब्लॉक व सुरक्षा व्यवस्था अपुरी आहे. कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र केबिन आणि सुरक्षा किटही नाहीत. ड्रेनेज लाईन नदीत सोडल्याचेही निदर्शनास (Pimpri Chinchwad crematorium)आले.

 

मामुर्डी : स्मशानभूमीत मद्यपान करणाऱ्यांचा वावर

 

मामुर्डी स्मशानभूमीत कर्मचारी, पिण्याचे पाणी, प्रकाश आणि स्वच्छतेची सुविधा अपुरी आहे. सभामंडपाच्या छताला गळती असून नदीकाठच्या पायऱ्यांवर ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी ग्रील नाही. गणेश विसर्जन घाट आणि स्मशानभूमी एकाच ठिकाणी असल्याने मद्यपान करणाऱ्यांचा वावर असल्याचेही पाहणीत समोर आले. शौचालयाची दुरवस्था, जाळ्यांची कमतरता आणि अरुंद रस्ता यामुळे नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत(Pimpri Chinchwad crematorium) आहे.

 

चिंचवड-केशवनगर : विधीनंतर नागरिकांना उघड्यावर अंघोळ

 

चिंचवड-केशवनगर येथील विद्युत दाहिनी परिसरात स्वच्छतागृह नादुरुस्त असून, विसाव्यासाठी शेड नाही. पिण्याचे पाणी, पंखे आणि पुरेशी प्रकाशव्यवस्था नाही. पायऱ्यांना सुरक्षा ग्रील नसून परिसरात कचरा साचला आहे. विधीनंतर नागरिकांना उघड्यावर अंघोळ करावी लागत असल्याने महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्नानव्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली. अस्थी ठेवण्यासाठी लॉकर आणि कर्मचाऱ्यांच्या कामकाजासाठी रजिस्टरचीही आवश्यकता असल्याचे मोरे यांनी(Pimpri Chinchwad crematorium) सांगितले.

 

देहूरोड-शितळानगर : ८.५० लाखांचे वीजबिल थकीत; विद्युत दाहिनी बंद

 

देहूरोड-शितळानगर येथील स्मशानभूमीतील विद्युत दाहिनी ८ लाख ५० हजार ३६० रुपयांचे वीजबिल थकीत असल्याने बंद असल्याचे समोर आले. येथे कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकही उपलब्ध नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत (Pimpri Chinchwad crematorium)आहे.

 

स्मशानभूमींमधील समस्या या केवळ दुरुस्तीपुरत्या मर्यादित नसून नागरिकांच्या सुरक्षितता, आरोग्य आणि सन्मानाशी निगडित आहेत. त्यामुळे प्रशासनाने सर्व स्मशानभूमींच्या समस्यांची तातडीने नोंद घेऊन कालबद्ध पद्धतीने सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी शैलजाताई मोरे यांनी(Pimpri Chinchwad crematorium) केली.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00