पिंपळे गुरव : दिलासा संस्था, मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या सेवाभावी संस्थांच्या वतीने रविवार, दिनांक २२ मार्च २०२६ रोजी पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानात “जल के बिना तो भैया काम ना चले” या पाणी जपून वापरण्याचा संदेश देणाऱ्या पथनाट्याचे सादरीकरण करून जनजागृती करण्यात (Save Water India) आली.
या पथनाट्यात भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज पाटील, मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेचे अध्यक्ष आण्णा जोगदंड, पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समितीचे अध्यक्ष प्रकाश घोरपडे, सौ. वैशाली चौधरी तसेच दिलासा संस्थेचे नंदकुमार कांबळे यांनी सहभाग(Save Water India) घेतला.
याप्रसंगी शिवाजीराव शिर्के, तानाजी एकोंडे, श्रीकांत चौगुले, अरुण पवार, बाळासाहेब साळुंके, पांडुरंग सुतार, विकास कोरे, सूर्यकांत कुरुलकर आदी उपस्थित(Save Water India) होते.
यावेळी दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक म्हणाले, “पाणी हे सर्व जीवसृष्टीसाठी पृथ्वीवरील अमृत आहे. जगाची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्यामुळे सर्वांनी पाणी जपून वापरणे अत्यंत आवश्यक (Save Water India) आहे.”
भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज पाटील म्हणाले, “जागतिक जलदिनाच्या निमित्ताने पथनाट्याच्या माध्यमातून ‘पाणी’ ही गंभीर समस्या बनत चालली आहे, याची जाणीव सर्वांना करून देण्याचा प्रयत्न करण्यात(Save Water India) आला.”
आण्णा जोगदंड म्हणाले, “जगातील तीन-चतुर्थांश भाग खाऱ्या पाण्याच्या समुद्राने व्यापलेला आहे, तर केवळ एक-चतुर्थांश भागात जमीन आणि गोडे पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे या पाण्याचा वापर सर्वांनी जपून करणे ही काळाची गरज (Save Water India) आहे.”
पथनाट्यानंतर कवयित्री राधाबाई वाघमारे आणि योगिता कोठेकर यांनी पाणी बचतीवर कविता सादर (Save Water India) केल्या.
पिंपळे गुरव परिसरातील उदय ववले, कल्पना भेलके, राहुल माने, बाळासाहेब देवकर, पवन रंधे, राहुल जाधव, शुभम बेंद्रे, सागर नागुलकर, सुवर्णा कांबळे, विवेक जाविर, काशिनाथ जोशी, शिवाजी कळसे, ऋषिकेश भोई, राहुल चव्हाण, शांतीसागर पाटील, मारुती कांबळे आदी मोठ्या संख्येने उपस्थित(Save Water India) होते.
कार्यक्रमाची सांगता पाणी बचतीची सामूहिक प्रतिज्ञा आणि राष्ट्रगीताने करण्यात (Save Water India) आली.




