प्रतिनिधी :महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या १२० वर्षांच्या इतिहासात प्रथमच उपेक्षित व मागासवर्गीय समाजाचे प्रतिनिधित्व करणारे प्रभाकर ओव्हाळ पुणे जिल्हा प्रमुख पदावर निवडून आले आहेत. त्यांनी मिळालेल्या या संधीचे नक्कीच सोनं करतील, असा विश्वास ज्येष्ठ साहित्यिक व माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त (Maharashtra Sahitya Parishad) केला.
सोहम सार्वजनिक ग्रंथालय, अंशुल प्रकाशन आणि जगद्गुरु प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने संत तुकाराम नगर येथील सोहम ग्रंथालयात प्रभाकर ओव्हाळ आणि कविवर्य राजन लाखे यांच्या सत्कारासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत (Maharashtra Sahitya Parishad) होते.
कार्यक्रमाला महापौर रवी लांडगे, गझलकार व साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, संयोजक जगन्नाथ नेरकर, ॲड. लक्ष्मण रानवडे, पत्रकार व लेखक विजय जगताप यांसह अनेक मान्यवर उपस्थित (Maharashtra Sahitya Parishad)होते.
डॉ. सबनीस पुढे म्हणाले की, “प्रभाकर ओव्हाळ यांनी आपल्या लेखणीतून उपेक्षित समाजाच्या वेदनांना नेहमीच न्याय देण्याचे काम केले आहे. त्यांच्या कार्यातून समाजात समरसतेची गुढी उभारली जाईल, असा विश्वास(Maharashtra Sahitya Parishad) आहे.”
महापौर रवी लांडगे यांनी आपल्या भाषणात नवनिर्वाचित सदस्यांचे कौतुक करत, “हे दोन्ही मान्यवर शहराचे भूषण आणि अभिमान आहेत. साहित्य परिषदेच्या उपक्रमांना महापालिका नेहमीच पाठिंबा देईल,” असे (Maharashtra Sahitya Parishad)सांगितले.
यावेळी प्रदीप निफाडकर आणि मानव कांबळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश वाघमारे यांनी केले, तर विष्णू मांजरे यांनी आभार प्रदर्शन (Maharashtra Sahitya Parishad)केले.



