रावेत : अधिक मासाचे औचित्य साधत तीर्थस्वरूप ज्येष्ठ नागरिक संघ, रावेत आणि ओम साई ग्रुप, निगडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘कृष्णायन’ या तीन दिवसीय भागवत कथाकथन सोहळ्याने भक्तिमय वातावरण निर्माण केले. ११ ते १३ जून दरम्यान झालेल्या या कार्यक्रमाला भाविक आणि श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद (Krishnayan Bhagwat Katha)लाभला.
पंढरपूरच्या प्रवचनकार विनया कुलकर्णी-उत्पात यांनी श्रीमद्भागवताच्या दशम स्कंधातील विविध प्रसंग रसाळ शैलीत उलगडून सांगितले. भगवान श्रीकृष्णाचे बालपण, यशोदा मातेचे वात्सल्य, माखनचोरी, कालियामर्दन, पूतनावध, गोपींचे कृष्णप्रेम आणि रासलीला यांसारख्या कथांमधून भक्तीचा सर्वोच्च मार्ग त्यांनी प्रभावीपणे (Krishnayan Bhagwat Katha) मांडला.
याशिवाय मथुरागमन, कंसवध, द्वारकेची स्थापना, रुक्मिणीहरण, जरासंधाशी संघर्ष, सुदाम्याची कथा आणि श्रीकृष्णाच्या अवतारसमाप्तीपर्यंतचा संपूर्ण जीवनप्रवास संगीतमय पद्धतीने सादर करण्यात आला. संवादिनीवादक वैभव केंगार यांनी गायन व वादनाची सुरेल साथ दिली, तर तबलावादक ओंकार कुलकर्णी यांनी कार्यक्रमात रंग (Krishnayan Bhagwat Katha)भरला.
कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे शिरीष कुंभार आणि शीला कुंभार यांचा विठ्ठल-रुक्मिणी वेशातील प्रतीकात्मक विवाह सोहळा. उपस्थितांनी या अनोख्या उपक्रमाचे उत्स्फूर्त स्वागत (Krishnayan Bhagwat Katha) केले.
यावेळी नवयुगचे संचालक संपतराव शिंदे यांचा पंचाहत्तरीनिमित्त तसेच माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांचा सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रा. तुकाराम पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात (Krishnayan Bhagwat Katha) आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशाल बडके, अनिकेत गुहे, राज अहेरराव, नेहा,अश्विनी कुलकर्णी, उज्ज्वला केळकर, चिंतामणी कुलकर्णी, रजनी अहेरराव, आर. आर. शिंदे, नंदकिशोर बडगुजर आणि दिलीप क्षीरसागर यांनी विशेष परिश्रम (Krishnayan Bhagwat Katha) घेतली.




