मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. पडताळणी प्रक्रियेत अपात्र ठरलेल्या सुमारे ८१ लाख महिलांकडून आतापर्यंत वितरित करण्यात आलेली आर्थिक मदत परत घेतली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, महिलांच्या नावाने अर्ज करून योजनेचा लाभ घेतलेल्या १४ हजार पुरुषांकडून संपूर्ण रक्कम वसूल करण्यात येणार असल्याचे त्यांनी
(Ladki Bahin Yojana) सांगितले.
लाभार्थ्यांच्या छाननीदरम्यान मोठ्या प्रमाणात अपात्र अर्ज आढळून आले आहेत. यामुळे अपात्र लाभार्थ्यांकडून अनुदानाची वसुली होणार का, याबाबत राज्यभरात चर्चा सुरू होती. यावर स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी महिलांना एकवेळची सवलत देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. त्यामुळे अपात्र महिलांकडून कोणतीही वसुली केली जाणार (Ladki Bahin Yojana) नाही.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, योजनेचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) यांच्याकडून लेखापरीक्षण होणार असले तरी महिलांविरुद्ध वसुलीची कारवाई केली जाणार नाही. मात्र, जाणूनबुजून चुकीची माहिती देऊन लाभ घेतलेल्या व्यक्तींवर कारवाई केली (Ladki Bahin Yojana) जाईल.
14 हजार पुरुषांवर कारवाई
डेटाबेसच्या आधारे करण्यात आलेल्या पडताळणीत महिलांच्या नावाने अर्ज करून १४ हजार पुरुषांनी योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. नियमांचे उल्लंघन करून मिळवलेला लाभ सार्वजनिक निधीचा गैरवापर मानला जात असल्याने संबंधितांकडून संपूर्ण रक्कम परत घेतली जाणार(Ladki Bahin Yojana) आहे.
पडताळणीत अनेक त्रुटी उघड
लाभार्थ्यांच्या छाननीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. त्यामध्ये सुमारे पाच लाख सरकारी कर्मचारी महिलांनी योजनेचा लाभ घेतल्याचे आढळले. तसेच सुमारे दहा लाख प्राप्तीकर भरणाऱ्या महिलांचाही लाभार्थ्यांमध्ये समावेश असल्याचे स्पष्ट झाले. जवळपास पाच लाख लाभार्थी कुटुंबांकडे चारचाकी वाहने असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय अनेक महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्याचेही निदर्शनास (Ladki Bahin Yojana) आले.
या सर्व कारणांमुळे संबंधित लाभार्थ्यांचे मानधन तात्पुरते स्थगित करण्यात आले (Ladki Bahin Yojana) आहे.
ई-केवायसीसाठी पुन्हा संधी
ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान तांत्रिक अडचणी किंवा माहितीतील त्रुटींमुळे अनेक पात्र महिलांना अडचणींचा सामना करावा लागला आहे. याची दखल घेत सरकार आवश्यक असल्यास ई-केवायसीसाठी पुन्हा विंडो सुरू करण्याचा विचार करत आहे. सुमारे २५ लाख अर्जांमध्ये त्रुटी आढळल्याने संबंधित महिलांना दुरुस्तीची संधी देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी(Ladki Bahin Yojana) सांगितले.
८१ लाखांचा आकडा दिशाभूल करणारा : आदिती तटकरे
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ८१ लाख अपात्र लाभार्थ्यांचा आकडा दिशाभूल करणारा असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या मते, ई-केवायसी प्रक्रिया केवळ लाडकी बहीण योजनेसाठी नसून राज्यातील सर्व थेट लाभ हस्तांतरण (DBT) योजनांसाठी लागू (Ladki Bahin Yojana) आहे.
फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे अनुदान वितरण सुरू असून संपूर्ण पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अपात्र लाभार्थ्यांची अचूक संख्या स्पष्ट होईल, असे त्यांनी(Ladki Bahin Yojana) सांगितले.
विरोधकांकडून सरकारवर टीका
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते जयंत पाटील यांनी या प्रकरणावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. मोठ्या प्रमाणावर महिलांना अपात्र ठरविण्यात आल्याने राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले. आर्थिक अडचणी वाढल्यास भविष्यात ही योजना टप्प्याटप्प्याने बंद होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचाही दावा त्यांनी(Ladki Bahin Yojana) केला.


