पिंपळे गुरव – काव्यात्मा साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मा. कवी आत्माराम हारे आणि उपाध्यक्ष मा. संजय साळुंखे यांनी २०२५ सालचे पुरस्कार (Kavyatma Award)जाहीर केले.
ज्येष्ठांच्या सन्मान सोहळ्यात ज्येष्ठ कवी व पत्रकार मा. बाबू डिसोजा यांना काव्यात्मा साहित्य सेवा पुरस्कार, दीपक अमोलिक यांना काव्यात्मा शब्दसारथी सेवा पुरस्कार, बाबाजी मगदूम यांना काव्यात्मा आनंदभक्ती सेवा पुरस्कार आणि अमित केदारी यांना काव्यात्मा साहित्य सेवा दर्पण पुरस्कार जाहीर करण्यात(Kavyatma Award) आले आहेत.
पिंपळे गुरव येथे मराठवाडा जनविकास संघाच्या कार्यालयात ३० नोव्हेंबर रोजी आयोजित भव्य समारंभात महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, पुणे यांचे अध्यक्ष मा. पुरुषोत्तम सदाफुले यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. प्रसिद्ध कवी मा. राजेंद्र वाघ यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभात अप्पा कसबेकर, संदीप तापकीर, मदन देगावकर आणि मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांची प्रमुख उपस्थिती (Kavyatma Award)राहणार आहेत.
या सोहळ्याचे औचित्य साधून निमंत्रित कवींचा काव्य संमेलनाचा कार्यक्रमदेखील आयोजित करण्यात (Kavyatma Award)आला आहे.


प्रतिनिधी:ज्ञान प्रबोधिनी निगडी पालक महासंघाच्या वतीने आयोजित ‘आरोग्यव्रत ’ व रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. खेळाच्या उद्देशाने सुरुवात झालेला पालकांचा छोटा गट आज सात विभागांत कार्यरत असून शालेय विद्यार्थ्यांसह पालक आणि समाज या स्तरावर विविध उपक्रम राबवित आहे. महासंघाची व्याप्ती सातत्याने वाढत असून आरोग्य आणि क्रीडा हे दोन प्रमुख (JP Health Drive) केंद्रबिंदू बनले आहेत.