प्रतिनिधी :फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये झालेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेच्या गुणपत्रक आणि प्रमाणपत्र वितरणाबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. राज्य मंडळाच्या सचिव डॉ. दिपक माळी यांनी यासंदर्भात सर्व विभागीय मंडळांना पत्र पाठविले (Marksheet Distribution) आहे.
या आदेशानुसार, बारावी परीक्षेचे गुणपत्रक, प्रमाणपत्र, स्थलांतर प्रमाणपत्र आणि तपशीलवार गुणदर्शिका यांचे वितरण सोमवार, २५ मे २०२६ रोजी करण्यात येणार आहे. संबंधित विभागीय मंडळांनी ही कागदपत्रे सकाळी ११ वाजता उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना उपलब्ध करून द्यावीत, असे निर्देश देण्यात आले (Marksheet Distribution)आहेत.
त्यानंतर शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी त्याच दिवशी दुपारी ३ वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रक व इतर प्रमाणपत्रांचे वाटप करायचे आहे. वितरण प्रक्रियेचे नियोजन व्यवस्थित करण्याच्या सूचना देखील मंडळाने दिल्या (Marksheet Distribution) आहेत.
राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांना आता त्यांच्या बारावीच्या निकालानंतर अधिकृत कागदपत्रांची प्रतीक्षा संपणार असून, पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी ही कागदपत्रे महत्त्वाची ठरणार (Marksheet Distribution) आहेत.
