प्रतिनिधी :अहिर सुवर्णकार समाजातील गायकांना समाजाचे एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने “सुवर्ण पिंपळ” समूहाच्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेल्या “सुवर्ण पिंपळ संगीत मंच” ला दि. २४ जानेवारी २०२६ रोजी समाजाच्या वार्षिक तिळगुळ समारंभात गाण्याची संधी देण्यात आली. अहिर सुवर्णकार समाज पुणे कार्यकारिणीने दिलेल्या या संधीचे सहभागी गायकांनी अक्षरशः सोने (Ahir Suvarnkar Samajकेले.
पूर्णपणे भरलेल्या सोनार वाड्यात समाज बांधवांनी गायकांच्या सादरीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या प्रतिसादामुळे गायकांना आपल्या कलेचे चीज झाल्याची भावना निर्माण झाली. कार्यक्रमाची सुरुवात सौ. मीनाक्षी ताई दुसाने व श्री. मिलिंद दुसाने यांच्या सुंदर निवेदनाने व श्री गणेश वंदनाने झाली. त्यानंतर सादर झालेल्या एकाहून एक सरस गीतांनी मैफिलीत रंग भरले. विशेषतः “संदेसे आते है” या गीताने उपस्थितांची मने (Ahir Suvarnkar Samaj)जिंकली.
तरुण तसेच ज्येष्ठ गायकांच्या सादरीकरणामुळे कार्यक्रम अधिकच रंगतदार झाला. या सुरेल मैफिलीमुळे वार्षिक तिळगुळ समारंभाचा आनंद खऱ्या अर्थाने द्विगुणित झाला. कार्यक्रमानंतर समाज बांधवांनी स्वादिष्ट व रुचकर स्नेहभोजनाचा आस्वाद घेत समाधानाने घरी प्रस्थान (Ahir Suvarnkar Samaj )केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅडव्होकेट जगदीश विसपुते यांनी केले. अध्यक्षस्थानी समाजाचे अध्यक्ष नंदकुमार वडनेरे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे समाजात एकोपा आणि कलाकारांना प्रोत्साहन मिळते, असे नमूद केले. कार्यक्रमाचा समारोप श्री. बापूसाहेब पिंगळे यांच्या आभार प्रदर्शनाने (Ahir Suvarnkar Samaj)झाला.
सुवर्ण पिंपळ संगीत मंच यांच्या गायकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल मंचाच्या वतीने अहिर सुवर्णकार समाज पुणे कार्यकारिणी, युवा ग्रुप तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचा प्रतिसाद देणाऱ्या सर्व समाज बांधवांचे आभार मानण्यात आले. यापुढेही समाजाच्या सहभागातून असेच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतील, असे आयोजकांनी (Ahir Suvarnkar Samaj) सांगितले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समाजाचे अध्यक्ष नंदकुमार वडनेरे, श्री. देवेंद्र घोडनदीकर, श्री. राजन वाघ, श्री. पराग वत्तुरकर, श्री. प्रशांत सौंदनकर, श्री. गोपाळ आगरकर, श्री. राजेंद्र विभांडिक, अॅड. जगदीश विसपुते तसेच गायक सुभाष चव्हाण यांनी विशेष परिश्रम (Ahir Suvarnkar Samaj) घेतले.
