चिंचवड | प्रतिनिधी:शिक्षण क्षेत्रात दर्जा, संस्कार आणि आधुनिकतेचा समतोल साधणाऱ्या गुरुक्षेत्रम फाउंडेशन अंतर्गत कार्यरत रॉयल विझडम स्कूलच्या चिंचवड येथील दुसऱ्या नव्या शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा रविवार, १ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी उत्साहात पार पडला. या निमित्ताने किडोज प्लॅनेट स्कूल आणि युफोरिया इंटरनॅशनल स्कूल या नव्या शैक्षणिक उपक्रमांचीही औपचारिक सुरुवात करण्यात (Royal Wisdom school)आली.
या उद्घाटन सोहळ्यास माजी नगरसेवक विजय लांडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी वैशाली लांडे, झामाताई बारणे, सिद्धेश्वर दादा बारणे, गोरक्षनाथ बारणे, डॉ. सागर वागज, वीणा धर्माधिकारी, स्वाती जोशी यांच्यासह किडोज प्लॅनेट स्कूल, युफोरिया इंटरनॅशनल स्कूल आणि रॉयल विझडम स्कूल परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित (Royal Wisdom school) होते.
गुरुक्षेत्रम फाउंडेशन आणि रॉयल विझडम स्कूलच्या अध्यक्षा सौ. गौरी पवनकुमार सोनकर, (ज्यांना चाईल्ड सायकोलॉजीचा मोठा अनुभव आणि अभ्यास आहे)व सौ. मंजिरी मंदार लपाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा शैक्षणिक उपक्रम साकार झाला आहे. त्यांच्या संकल्पनेनुसार शिक्षण म्हणजे केवळ अभ्यासक्रम नव्हे, तर संस्कार, मूल्ये आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव रुजवणारी प्रक्रिया असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.या उपक्रमामागे रॉयल विझडम स्कूलच्या अध्यक्षा सौ. गौरी सोनकर यांचे मोलाचे योगदान आहे. त्या बाल मानसोपचारतज्ज्ञ (Child Psychologist) असून, शिक्षण क्षेत्रातील १८ वर्षांहून अधिक अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासावर आधारित शिक्षणपद्धती ही त्यांच्या कार्याची खास ओळख (Royal Wisdom school)आहे.

गुरुक्षेत्रम फाउंडेशनचे विश्वस्त श्री. पवनकुमार सोनकर (M.Tech – IIT दिल्ली, सस्टेनेबिलिटी आर्किटेक्ट, Philips) यांनी या शैक्षणिक उपक्रमाला मार्गदर्शन व पाठबळ दिले आहे. तसेच श्री. मंदार लपाटे (सिव्हिल इंजिनिअर – पेटकर ग्रुप) यांनी शाळेच्या उभारणीसाठी मोलाची मदत केली (Royal Wisdom school)आहे
नव्या शाखेमध्ये प्ले ग्रुप, नर्सरी, एलकेजी, यूकेजी तसेच इयत्ता पहिली ते सहावीपर्यंतचे शिक्षण दिले जाणार आहे. त्याचबरोबर टी.टी.सी., फॉनिक्स, अबॅकस, नृत्य, ट्युशन्स, डे-केअर आणि कराटे यांसारख्या उपक्रमांची सुविधाही विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. आधुनिक इमारत, सुरक्षित व शिस्तबद्ध वातावरण, अनुभवी शिक्षकवर्ग आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षणपद्धती ही या शाळेची प्रमुख वैशिष्ट्ये ठरणार (Royal Wisdom school)आहेत.
कार्यक्रमादरम्यान प्राचीन भारतीय परंपरेतील गर्भसंस्कार संकल्पनेचा उल्लेख करत, जन्मापूर्वीच आणि बालवयापासूनच मुलांमध्ये सकारात्मक मूल्ये, नागरिकत्वाची जाणीव व सामाजिक भान रुजवणे किती आवश्यक आहे, यावर मार्गदर्शन करण्यात आले. ज्या प्रकारे एखाद्या रोपाचे संगोपन केल्यास त्याचा भक्कम वृक्ष होतो, त्याचप्रमाणे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक आणि शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे उपस्थित मान्यवरांनी नमूद (Royal Wisdom school)केले.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून, पालकांकडून या नव्या शाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली. उद्घाटन सोहळ्यास पालक, नागरिक आणि शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित (Royal Wisdom school)होते.

कार्यालयीन वेळ : सकाळी ८.३० ते दुपारी ४.०० (सोमवार ते शनिवार)
संपर्क : ७४४७२ ३८८८३ (चिंचवड) / ७४४७२ ३८८८० (डूडुळगाव)
ठिकाण : राघवेंद्र स्वामी मंदिराजवळ(Royal Wisdom school), चिंचवड
