भारताचा अंडर-19 विश्वविजय; इंग्लंडवर 100 धावांनी दणदणीत मात
हरारे : आयसीसी अंडर-19 क्रिकेट विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने इंग्लंडचा 100 धावांनी पराभव करत सहाव्यांदा विश्वविजेतेपद पटकावले. हरारे स्पोर्ट्स क्लबवर झालेल्या या लढतीत भारताने सर्व विभागांत वर्चस्व गाजवत ऐतिहासिक विजय (U 19-Champions) नोंदवला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारताने निर्धारित 50 षटकांत 9 बाद 411 धावांचा डोंगर उभारला. भारताच्या डावात वैभव सूर्यवंशी याने केलेली स्फोटक खेळी केंद्रस्थानी ठरली. सूर्यवंशीने अवघ्या 80 चेंडूंत 175 धावांची तडाखेबंद खेळी करत अंतिम सामन्यातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या नोंदवली. त्याच्या डावात अनेक चौकार-षटकारांचा पाऊस (U 19-Champions) पडला.
कर्णधार आयुष म्हात्रे याने संयमी 53 धावा करत संघाला भक्कम आधार दिला, तर कनिष्क चौहानने अखेरच्या षटकांत नाबाद 37 धावांची उपयुक्त खेळी साकारली. त्यामुळे भारताला 400 पार मजल मारता (U 19-Champions)आली.
412 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची फलंदाजी भारतीय गोलंदाजांसमोर फार काळ टिकू शकली नाही. नियमित अंतराने गडी बाद होत गेल्याने इंग्लंडचा डाव 40.2 षटकांत 311 धावांवर आटोपला. भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करत सामन्यावर पकड मजबूत (U 19-Champions) केली.
या विजयासह भारताने अंडर-19 विश्वचषकावर सहाव्यांदा नाव कोरले असून सर्वाधिक वेळा विजेतेपद मिळवणारा संघ म्हणून भारताची ओळख अधिक भक्कम झाली आहे. या युवा संघाच्या यशामुळे भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठी आशादायक चित्र उभे राहिले (U 19-Champions) आहे.
