प्रतिनिधी:राज्याच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात पिंपरी-चिंचवड शहरातील कामगार, आयटी क्षेत्र, वाहतूक, औद्योगिक परिसर आणि प्रशासनाशी संबंधित प्रमुख प्रश्नांना प्राधान्य देऊन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आमदार शंकर जगताप सज्ज झाले आहेत. शहरातील कंपन्यांमध्ये वाढत्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर ‘सेफ्टी ऑडिट’ अनिवार्य करण्याची मागणी तसेच हिंजवडीतील आयटीयन्सच्या अडचणी सोडवण्यासाठी ‘फास्टट्रॅक लेबर कोर्ट’ स्थापन करण्यावर ते विशेष भर देणार आहेत. याशिवाय एकूण 48 तारांकित प्रश्नांद्वारे राज्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर उत्तरदायित्व निश्चित करण्याचा प्रयत्न होणार असल्याची माहिती (Hinjewadi Issues Court)आमदार जगताप यांनी दिली.
अधिवेशनात प्राधान्याने मांडले जाणारे मुद्दे
राज्याचे हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबरपासून 14 डिसेंबरपर्यंत नागपूर येथे होत आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड आणि राज्यातील महत्त्वाच्या विषयांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आमदार जगताप पुढील मुद्दे मांडणार (Hinjewadi Issues Court)आहेत
• पिंपरी-चिंचवडमधील उद्योग क्षेत्रातील वाढत्या दुर्घटनांवर सेफ्टी ऑडिट सक्तीचे करणे
• पवना नदी सुधार प्रकल्पासाठी निधी तरतूद आणि तातडीने अंमलबजावणी
• अप्रशिक्षित वाहनचालकांमुळे होणारे अपघात कमी करण्यासाठी सक्षम प्रशिक्षण यंत्रणा स्थापित करणे
• हिंजवडी आयटी पार्कमधील कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ‘फास्टट्रॅक लेबर कोर्ट’ स्थापन करणे
• उद्योग नगरीतील अघोषित भारनियमनावरील उपाययोजना
• पीएमआरडीएच्या लिलावातील भूखंड विक्रीला स्थगिती देणे
• काळेवाडी-हिंजवडी आणि बिजलीनगर या महावितरण शाखांचे विभाजन
• महाज्योतीमार्फत वंचित समाजातील विद्यार्थ्यांना थकीत 126 कोटींची शिष्यवृत्ती तत्काळ मंजूर करणे
• पिंपरी-चिंचवड शहरातील कोट्यवधी रुपयांचे CCTV कॅमेरे बंद पडल्याची बाब गांभीर्याने घेणे
• पिंपरी-चिंचवड महापालिकेचा प्रारूप विकास आराखडा (DP) त्रुटींमुळे रद्द करणे
• काळेवाडी-रहाटणी परिसरातील दारू दुकानाचा (CL-III 300) परवाना (Hinjewadi Issues Court) रद्द करणे
तारांकित प्रश्नांद्वारे सभागृहात मांडले जाणारे विषय
आमदार जगताप यांनी पिंपरी-चिंचवड आणि राज्यातील नागरिकांच्या अडचणींवर आधारित 48 तारांकित प्रश्नही सभागृहात मांडण्यासाठी दाखल केले आहेत. त्यातील काही प्रमुख मुद्दे:
• गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये लिफ्ट सुरक्षा तपासणी आणि नियमांचे पालन
• इलेक्ट्रिक वाहनांवरील टोल माफीचा आदेश न पाळणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई
• रुबी हॉल क्लिनिकच्या किडनी प्रत्यारोपण प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई
• लाखो शिधापत्रिका अर्ज प्रलंबित राहिल्याने नागरिकांना होणारी गैरसोय
• औंध जिल्हा रुग्णालयातील MRI सुविधा बंद – तातडीने पुनर्बांधणी
• कुपोषित बालकांना पुरवठा होणाऱ्या पोषक आहारातील अनियमिततेची चौकशी
• पिंपरी-चिंचवड मनपाच्या 4,776 रिक्त पदांसाठी सुधारित आकृतिबंध मंजुरी
• नवीन TOD वीजमीटर संदर्भातील तक्रारींचे निराकरण
• निगडी अप्पर तहसील कार्यालयातील कामकाजातील दिरंगाई
• वाकड–हिंजवडीचे खटले पौड न्यायालयाऐवजी पिंपरी न्यायालयात वर्ग करणे
• मनपा रुग्णालयांमध्ये कॅशलेस सुविधा सुरू करणे
• राज्यातील 12,000 प्राध्यापकांची रिक्त पदे तातडीने भरणे
• सांगवी जिल्हा रुग्णालयातील शिवविच्छेदन विभागासाठी फॉरेन्सिक डॉक्टरची नियुक्ती
• प्राधिकरणाच्या आरक्षित जागांवरील दीर्घकालीन ताबेदारांना मालकीहक्क (7/12 आणि प्रॉपर्टी कार्ड वितरण)
आमदार जगताप म्हणाले:
“पिंपरी-चिंचवडच्या सुरक्षिततेपासून ते वाहतूक, उद्योग, आरोग्य, प्रशासन आणि शहराच्या एकूणच शाश्वत विकासासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक प्रश्नाची मांडणी अधिवेशनात ठामपणे करणार आहे. नागरिकांना न्याय मिळावा आणि शहराचा विकास गतीमान व्हावा यासाठी शासनाकडून सकारात्मक निर्णय मिळतील, असा (Hinjewadi Issues Court) मला विश्वास आहे.”
