प्रतिनिधी:मुंढवा येथील 40 एकर जमीन घोटाळा प्रकरणातील प्रमुख आरोपी शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी अटक केली असून तिच्याकडून महत्त्वाची चौकशीही करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी एक मोठी कारवाई करत दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांनाही अटक करण्यात आली आहे. बावधन पोलिसांनी भोर येथे त्यांच्या घरी जाऊन ही कारवाई (Mundhva Land Scam) केली.
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीच्या वादग्रस्त जमीन व्यवहाराचा दस्त तयार करणारे अधिकारी म्हणून रवींद्र तारू यांचे नाव समोर आले होते. हा दस्त बावधन उपनिबंधक कार्यालयात झाला होता. नियमबाह्य दस्त करून व्यवहाराला वैधता मिळवून दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. शीतल तेजवानीला आधीच अटक झाली होती आणि आता तारू यांनाही अटक झाल्याने प्रकरणात नवे वळण आले (Mundhva Land Scam आहे.
मुंढवा येथील अंदाजे 1800 कोटी रुपयांच्या जमिनीचा व्यवहार केवळ 300 कोटींमध्ये करण्यात आला होता, तसेच या व्यवहारासाठी स्टॅम्प ड्युटी फक्त 500 रुपये भरल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. एक लाख रुपयांच्या भांडवलाची कंपनी एवढा मोठा व्यवहार कसा करू शकते, असा प्रश्नही उपस्थित करण्यात (Mundhva Land Scamआला होता.
या व्यवहाराला गती देण्यासाठी उद्योग संचालनालयाने केवळ 48 तासांत स्टॅम्प ड्युटी माफ केली आणि संपूर्ण प्रक्रिया 27 दिवसांत पूर्ण झाल्याचे समोर आले. प्रकरण माध्यमांमध्ये आल्यानंतर उपमुख्यमंत्री आणि पार्थ पवार यांचे वडील अजित पवार यांनी व्यवहार रद्द केल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली होती.या सर्व प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले (Mundhva Land Scam आहे.
