पिंपरी : दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर केंद्र सरकारकडून झालेल्या कथित अत्याचाराच्या निषेधार्थ तसेच विद्यार्थ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत गुरुवार, २३ जुलै २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सरकारविरोधी निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात संविधानप्रेमी, लोकशाहीवादी, युवक, विद्यार्थी, पालक तसेच विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभाग(Delhi Students Protest) नोंदवला.
आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी (Delhi Students Protest)दिला.
हे आंदोलन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, मारुती भापकर, मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली तसेच विविध सामाजिक संघटनांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात(Delhi Students Protest) आले.
यावेळी छावा युवा मराठा महासंघाचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सतीश काळे, नेते प्रवीण कदम, आपना वतन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सिद्दिक शेख, जयश्री शिरवळकर, नागरी हक्क सुरक्षा समितीचे प्रदीप पवार, मराठा सेवा संघाचे नेते प्रकाश जाधव तसेच आम आदमी पक्षाचे युवक अध्यक्ष विकी पासोटे आदी उपस्थित (Delhi Students Protest)होते.



