पिंपरी (प्रतिनिधी):
मद्यपानाच्या कारणावरून झालेल्या (pimpri-pirangut-firing) वादातून एका तरुणावर गावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याची धक्कादायक घटना बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिरंगुट येथील सावकारवाडी भागात घडली. या घटनेत ओंकार ऊर्फ सनी गोळे हा तरुण जखमी झाला असून, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्याआरोपींची नावे सागर ऊर्फ ऋषिकेश संभाजी गोळे (३१) आणि महेश तानाजी कदम (२४, दोघेही रा. पिरंगुट, ता. मुळशी) अशी आहेत. याशिवाय त्यांच्या दोन साथीदारांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांचा(pimpri-pirangut-firing) शोध सुरू आहे.
बावधन पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक अनिल बत्तिशे यांनी फिर्याद नोंदवली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार आरोपींनी आपसात संगनमत करून सनी गोळे याच्याशी मद्यपानाच्या कारणावरून वाद घातला. त्यावेळी त्यांनी शिवीगाळ करत धमकी दिली. वाद चिघळताच एका आरोपीने “पिरंगुटमध्ये फक्त माझीच चालणार” असे म्हणत कमरेला लपवून ठेवलेल्या गावठी कट्ट्यातून गोळी झाडली. गोळी(pimpri-pirangut-firing) सनीच्या उजव्या बाजूला लागल्याने तो गंभीर जखमी झाला.
घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांनी तातडीने पथक राबवून दोघांना अटक केली असून, उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू आहे. बावधन (pimpri-pirangut-firing)पोलीस ठाण्याचे पथक या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.
