पिंपरी-चिंचवड : शहरातील अनेक भागांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. प्राधिकरण परिसरात शुक्रवारी सकाळी घडलेल्या एका घटनेने हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला (Stray Dogs Attack )आहे.
आज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलो असताना प्राधिकरण येथील स्वप्नपूर्ती सोसायटीजवळ माझ्या डोळ्यांसमोर हा थरारक प्रकार घडला. माझ्या काही अंतरावर चालणाऱ्या एका व्यक्तीवर अचानक तीन भटक्या कुत्र्यांनी धाव घेतली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे ती व्यक्ती पूर्णपणे गोंधळून गेली. कुत्र्यांच्या आक्रमक भुंकण्यामुळे परिसरातील आणखी काही भटकी कुत्री तेथे जमा झाली आणि परिस्थिती अधिक गंभीर(Stray Dogs Attack )बनली.

क्षणाचाही विलंब न करता मी हातातील छत्री उगारून त्या कुत्र्यांना परतवून लावण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी परिसरातील काही नागरिकही मदतीला धावून आले. त्यानंतर कुत्री मागे हटली आणि संभाव्य मोठा अनर्थ टळला. त्या क्षणी परिस्थिती अत्यंत धोकादायक होती. थोडाही उशीर झाला असता तर संबंधित व्यक्तीला किंवा मदतीसाठी पुढे गेलेल्या नागरिकांनाही गंभीर दुखापत झाली असती, अशी परिस्थिती निर्माण झाली (Stray Dogs Attack )होती.
घटनेनंतर परिसरातील काही ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला असता, अशा प्रकारच्या घटना या भागात वारंवार घडत असल्याचे त्यांनी सांगितले. सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडणारे नागरिक, शाळेत जाणारी लहान मुले, महिला तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्यामध्ये या भटक्या कुत्र्यांमुळे भीतीचे वातावरण असल्याचे त्यांनी नमूद केले. अनेकदा कुत्र्यांचे कळप नागरिकांच्या अंगावर धावून जात असल्याचाही अनुभव त्यांनी (Stray Dogs Attack )सांगितला.
भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे रेबीजसारख्या जीवघेण्या आजाराचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा घटनांकडे केवळ किरकोळ प्रकार म्हणून न पाहता सार्वजनिक आरोग्य आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गांभीर्याने पाहण्याची गरज (Stray Dogs Attack )आहे.
काही नागरिकांच्या मते, सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांना अनियंत्रितपणे खाद्य दिल्यामुळे काही भागात कुत्र्यांचे कळप तयार होतात. मात्र, या प्रश्नाकडे केवळ एका बाजूने पाहून चालणार नाही. प्राण्यांशी क्रूरता न करता नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे ही स्थानिक प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे नियोजनबद्ध निर्बीजीकरण, रेबीज प्रतिबंधक लसीकरण, कचरा व्यवस्थापन, भटक्या कुत्र्यांचे वैज्ञानिक पद्धतीने व्यवस्थापन आणि नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कारवाई या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याची गरज (Stray Dogs Attack )आहे.
नागरिकांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेने भटक्या कुत्र्यांचे सर्वेक्षण करून संवेदनशील भागांची ओळख करावी, विशेष पथके कार्यरत करावीत आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली (Stray Dogs Attack )आहे.
शहरात माणूस आणि प्राणी यांचे सहअस्तित्व महत्त्वाचे असले, तरी नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होणार नाही, याची खात्री करणे हे प्रशासनाचे प्रथम कर्तव्य आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा अशा घटना टाळण्यासाठी आताच प्रभावी पावले उचलण्याची गरज असल्याची भावना परिसरातील नागरिक व्यक्त करत(Stray Dogs Attack ) आहेत.



