पिंपरी-चिंचवड : शहरातील खेळाडूंना अधिक चांगल्या आणि दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेचे क्रीडा सभापती कैलास कुटे यांनी ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक १५ मधील विविध क्रीडा प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी मैदानांची सद्यस्थिती, देखभाल आणि आवश्यक सुविधा यांचा सविस्तर आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना (Kailas Kute Pcmc) दिल्या.
या पाहणी दौऱ्यात उपमहापौर शर्मिलाताई राजेंद्र बाबर, नगरसेविका शैलजाताई मोरे, नगरसेवक अमित गावडे आणि नगरसेवक धर्मपाल तंतरपाले यांच्यासह पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे परिसरातील व्यायामशाळा, जलतरण तलाव आणि क्रीडांगणांची पाहणी करून खेळाडूंना भेडसावणाऱ्या अडचणींची माहिती(Kailas Kute Pcmc) घेतली.
दौऱ्यादरम्यान प्राधिकरण सेक्टर २६ येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव आणि व्यायामशाळा, डॉ. हेडगेवार भवन येथील लॉन टेनिस कोर्ट, नेताजी सुभाषचंद्र बोस बॅडमिंटन हॉल तसेच सावरकर उद्यानातील टेनिस कोर्टला भेट देण्यात आली. याशिवाय निगडी परिसरातील मदनलाल धिंग्रा मैदान, बाहुबली व्यायामशाळा आणि सेक्टर २८ मधील कै. संजय काळे मैदान व कुस्ती संकुलाचीही पाहणी करण्यात(Kailas Kute Pcmc) आली.
यावेळी बोलताना क्रीडा सभापती कैलास कुटे यांनी सांगितले की, शहरातील तरुण आणि उदयोन्मुख खेळाडूंना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे हा या पाहणी दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. मैदानांची योग्य देखभाल, विद्युत व्यवस्था आणि आवश्यक तांत्रिक सुधारणा याबाबत त्यांनी संबंधित अभियंत्यांना सूचना (Kailas Kute Pcmc)दिल्या.
या पाहणीसाठी क्रीडा पर्यवेक्षक गोरक्ष तिकोने, ज्युनिअर इंजिनिअर संदीप ठोकळे, संकेत गंधमवार तसेच क्रीडा अधिकारी गंगाराम कारंडे यांचे सहकार्य लाभले. आगामी काळात या सर्व क्रीडा संकुलांचा विकास करून खेळाडूंना अधिक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात (Kailas Kute Pcmc)आला.
