प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असतानाच प्रभाग क्रमांक २१ मध्ये एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी रात्री मोठ्या प्रमाणात नकली दारू पकडल्याने राजकीय वर्तुळासह संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली (Ward 21 News) आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अंदाजे ११ बॉक्स नकली दारू ताब्यात घेतली असून ही दारू मतदारांना वाटप करण्यासाठी नेली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेदरम्यान दारू वाटप करणारे सुमारे पाच ते सहा जण घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी(Ward 21 News) दिली.
घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डब्बू आसवाणी आणि संदीप वाघेरे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या प्रकाराची त्वरित माहिती निवडणूक आयोग तसेच पिंपरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलक(Ward 21 News) यांना दिली.
माहिती मिळताच निवडणूक अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलक यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित वाहनासह घटनास्थळी आढळलेले सर्व नकली दारूचे बॉक्स ताब्यात घेण्यात आले असून, या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली (Ward 21 News)आहे.
निवडणूक काळात मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी अशा प्रकारांचा वापर केला जात असल्याचा संशय व्यक्त होत असून, या घटनेमुळे प्रभाग क्रमांक २१ मधील राजकीय वातावरण अधिकच (Ward 21 News)तापले आहे.
