पुणे : गझलविधा समूहाच्या वतीने वार्षिक पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन रविवार, २३ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे. सकाळी १०.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार असून, गझल क्षेत्रातील विविध उपक्रम, पुरस्कार आणि गझल सादरीकरणाने कार्यक्रमाची रंगत वाढणार (Gazalvidha Samuh)आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.३० वाजता अल्पोपाहार व चहापानाने होईल. त्यानंतर सकाळी ११ वाजता उद्घाटन होणार आहे. उद्घाटनप्रसंगी भूषण कटककर, डॉ. कैलास गायकवाड, प्रमोद खराडे आणि डॉ. शिवाजी काळे यांची उपस्थिती राहणार आहे. डॉ. कैलास गायकवाड उद्घाटनपर मनोगत, तर डॉ. शिवाजी काळे ‘गझलसंग्रह निर्मितीचे आजचे स्थान’ या विषयावर मनोगत व्यक्त करतील. प्रमोद खराडे ‘पुरस्कार व जबाबदारी’ या विषयावर विचार (Gazalvidha Samuh)मांडतील.
यानंतर ‘गझलविधा समूह उपक्रम सन्मान’ विभागात सातत्याने उत्कृष्ट प्रतिसाद लेखन, चित्रविस्तार गझलेतील सर्वोत्कृष्ट सहभाग, चित्रविस्तार गझल संमेलनातील मूल्यवर्धक मार्गदर्शन तसेच ऑनलाइन गझल संमेलनातील लक्षवेधी व पुरस्कारप्राप्त गझलकारांचा सन्मान करण्यात येणार (Gazalvidha Samuh)आहे.
‘गझलविधा वार्षिक पुरस्कार’ विभागात गझलपालवी, गझलबहर आणि गझलसाफल्य या पुरस्कारांचे वितरण होईल. यावेळी पुरस्कारप्राप्त गझलकारांचा गौरव करण्यात येणार असून, ‘शुभ्र मनाचा कागद’ या नचिकेत जोशी यांच्या गझलसंग्रहाच्या वैशिष्ट्यांवर डॉ. स्नेहल कुलकर्णी भाष्य करणार (Gazalvidha Samuh)आहेत.
दुपारी १२.४० ते २.५० या कालावधीत दोन सत्रांमध्ये गझल संमेलन होणार असून, विविध गझलकार आपल्या गझलांचे सादरीकरण करतील. गझल सादरीकरणासाठी प्रत्येक गझलकाराला कमाल आठ मिनिटांचा कालावधी देण्यात आला (Gazalvidha Samuh)आहे.
कार्यक्रमाच्या समारोप सत्रात मुक्ता भुजबले आभार प्रदर्शन करतील. त्यानंतर सर्व पुरस्कारप्राप्त आणि उपस्थित गझलकारांचे सामूहिक छायाचित्र घेण्यात येणार आहे.गझलविधा समूहाच्या प्रशासनाच्या वतीने आयोजित या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात गझल क्षेत्रातील साहित्यिक, गझलकार आणि रसिक मोठ्या संख्येने सहभागी होणार (Gazalvidha Samuh)असल्याची अपेक्षा संयोजकांनी व्यक्त केली आहे.
