Home तंत्रज्ञान Pcmc Red Zone:पिंपरी-चिंचवडच्या विकासाला गती; रेड झोनसह संरक्षण विभागाचे प्रश्न मार्गी लागणार

Pcmc Red Zone:पिंपरी-चिंचवडच्या विकासाला गती; रेड झोनसह संरक्षण विभागाचे प्रश्न मार्गी लागणार

पिंपरी-चिंचवडच्या रेड झोन, कचरा प्रक्रिया प्रकल्प आणि पिंपळे सौदागर अग्निशमन केंद्रासाठी जागेबाबत संरक्षण विभागासोबत सकारात्मक चर्चा.

by Admin
Spread the love

(पिंपरी-चिंचवड, दि. १४ ऑगस्ट २०२६ ): पिंपरी-चिंचवड शहरातील संरक्षण विभागाशी संबंधित अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने सकारात्मक प्रगती होत आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची काही दिवसांपूर्वी भेट घेऊन शहराच्या विकासाशी संबंधित मुद्दे मांडल्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार खडकी हेडक्वार्टर्स येथे संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक पार (Pcmc Red Zone)पडली.

 

महापौर रवि लांडगे यांनी कर्नल रवि कुमार गरगोत्रा यांच्यासोबत शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. यामध्ये रेड झोनची हद्द कमी करणे व शक्य त्या ठिकाणी निर्बंध शिथिल करणे, हॉटेल कलासागरजवळील संरक्षण विभागाची जागा कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी उपलब्ध करून देणे तसेच पिंपळे सौदागर परिसरात नवीन अग्निशमन केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देणे, या प्रमुख विषयांचा समावेश (Pcmc Red Zone)होता.

 

मॅगझिन चौक येथील अम्युनेशन डेपो स्थलांतरित झाल्याने त्या परिसरावरील रेड झोन निर्बंध पूर्णतः हटविण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली. रेड झोनचा प्रश्न हजारो नागरिकांच्या मालमत्ता, बांधकामे आणि परिसराच्या विकासाशी थेट संबंधित असल्याने यावर निर्णय झाल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा (Pcmc Red Zone)आहे.

 

शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील गरजा लक्षात घेता कचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याच्या दृष्टीने हॉटेल कलासागरजवळील संरक्षण विभागाची जागा कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. तसेच पिंपळे सौदागर व परिसरातील आपत्कालीन सेवा अधिक सक्षम करण्यासाठी नवीन अग्निशमन केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबतही सकारात्मक भूमिका मांडण्यात (Pcmc Red Zone)आली.

 

केंद्र शासन, संरक्षण मंत्रालय, संरक्षण विभाग आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्यात समन्वय साधून हे प्रश्न निर्णायक टप्प्यापर्यंत नेण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे महापौर रवि लांडगे यांनी (Pcmc Red Zone)सांगितले.

 

महापौर रवि लांडगे म्हणाले, “रेड झोनसह संरक्षण विभागाशी संबंधित अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर आणि शहराच्या विकासावर होत आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या विषयांची सकारात्मक दखल घेतल्यामुळे संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पुढील स्तरावर चर्चा झाली. विशेषतः मॅगझिन चौक येथील अम्युनेशन डेपो स्थलांतरित झाल्याने त्या परिसरावरील रेड झोन निर्बंध हटविण्याच्या दृष्टीने सकारात्मक कार्यवाही होईल, असा विश्वास आहे. कचरा प्रक्रिया प्रकल्प आणि नवीन अग्निशमन केंद्रासाठी आवश्यक जागा मिळविण्यासाठीही पाठपुरावा सुरू राहील. हे प्रश्न केवळ चर्चेपुरते न ठेवता ठोस निर्णयापर्यंत नेऊन नागरिकांना प्रत्यक्ष दिलासा देणे, हेच आमचे ध्येय (Pcmc Red Zone)आहे.”

 

बैठकीस नगररचना उपसंचालक ललित खोब्रागडे, सहाय्यक संचालक संदेश खडतरे, खडकी हेडक्वार्टर्सचे जनसंपर्क अधिकारी किरण पवार तसेच संरक्षण विभाग आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित(Pcmc Red Zone) होते.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00