Home तंत्रज्ञान Pcmc Traffic Solution :पिंपरी-चिंचवड-पुणे वाहतूक कोंडीवर उपाय; त्रिवेणीनगर व खडकीत उड्डाणपुलांची सामाजिक कार्यकर्ते राजेश अगरवाल यांची मागणी

Pcmc Traffic Solution :पिंपरी-चिंचवड-पुणे वाहतूक कोंडीवर उपाय; त्रिवेणीनगर व खडकीत उड्डाणपुलांची सामाजिक कार्यकर्ते राजेश अगरवाल यांची मागणी

त्रिवेणीनगर चौकातील स्पाइन रोड आणि खडकीतील ऑल सेंट स्कूल चौकातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उड्डाणपूल उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.

by Admin
Spread the love

पिंपरी : मुकाई चौक ते नाशिक रस्त्याला जोडणाऱ्या स्पाइन रोडवरील त्रिवेणीनगर चौकात सातत्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे वाहनचालकांचा वेळ वाया जात असून, परिसरातील वायू आणि ध्वनी प्रदूषणातही वाढ होत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी त्रिवेणीनगर चौकात तातडीने उड्डाणपूल उभारण्याची मागणी होत (Pcmc Traffic Solution)आहे.

स्पाइन रोड हा मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, जुना मुंबई-पुणे रस्ता आणि पुणे-नाशिक महामार्गाला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असताना त्रिवेणीनगर चौकात वाहतुकीचा वेग मंदावतो आणि मोठ्या प्रमाणात कोंडी निर्माण (Pcmc Traffic Solution)होते.

या चौकातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी उड्डाणपूल उभारल्यास मुख्य वाहतूक विनाअडथळा सुरू राहण्यास मदत होईल. त्यामुळे वाहनचालकांचा वेळ वाचण्याबरोबरच इंधनाची बचत आणि प्रदूषण कमी होण्यासही हातभार लागेल. संबंधित प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन उड्डाणपुलाच्या कामासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात येत (Pcmc Traffic Solution)आहे.

२)

पिंपरी : मुंबई-पुणे रस्त्यावरील खडकी परिसरात रस्त्यांचे रुंदीकरण झाल्याने पिंपरी-चिंचवडहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांचा वेग वाढला आहे. मात्र, ऑल सेंट स्कूल चौकात मोठ्या प्रमाणात वाहने एकत्र येत असल्याने या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. ही कोंडी दूर करण्यासाठी चौकात उड्डाणपूल उभारण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले (Pcmc Traffic Solution)आहे.

रस्त्याचे रुंदीकरण झाल्यानंतर वाहतुकीचा प्रवाह वाढला असला तरी ऑल सेंट स्कूल चौकातील वाहतूक व्यवस्थेमुळे वाहनांना अडथळा निर्माण होतो. परिणामी पिंपरी-चिंचवड आणि पुणे या दोन्ही शहरांदरम्यानच्या वाहतुकीवर त्याचा परिणाम होत (Pcmc Traffic Solution)आहे.

या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून ऑल सेंट स्कूल चौकात उड्डाणपूल उभारण्याच्या दृष्टीने लोकप्रतिनिधी आणि संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करावा. उड्डाणपूल उभारल्यास चौकातील वाहतूक कोंडी कमी होऊन पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरांदरम्यानची वाहतूक अधिक गतिमान होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली (Pcmc Traffic Solution)आहे.

– राजेश अग्रवाल एम्पायर इस्टेट, (Pcmc Traffic Solution) चिंचवड

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00