Home माझं पिंपरी चिंचवड Pimpri Chinchwad City Journalists Association:पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघाकडून पत्रकार सदस्यांना रेनकोटचे वाटप

Pimpri Chinchwad City Journalists Association:पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघाकडून पत्रकार सदस्यांना रेनकोटचे वाटप

पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार सदस्यांना पावसाळ्यातील बातमीदारी सुलभ व्हावी या उद्देशाने उच्च दर्जाच्या रेनकोटचे वाटप करण्यात आले. स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या हस्ते वितरण झाले.

by Admin
Spread the love

पिंपरी, दि. ७ : पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार सदस्यांना पावसाळ्यातील बातमीदारी सुलभ व्हावी या उद्देशाने उच्च दर्जाच्या रेनकोटचे वाटप करण्यात आले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य इमारतीतील पत्रकार कक्षात झालेल्या कार्यक्रमात स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या हस्ते रेनकोटचे वितरण करण्यात आले.

यावेळी अखिल मराठी पत्रकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे, शहराध्यक्षा सायली कुलकर्णी तसेच संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

यावेळी बापूसाहेब गोरे म्हणाले, “पत्रकारांना उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा अशा सर्व ऋतूंमध्ये फिल्डवर कार्यरत राहावे लागते. पावसाळ्यात सुरक्षित आणि अडथळामुक्तपणे बातमीदारी करता यावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून, त्यांच्या कामासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संघ सातत्याने प्रयत्नशील आहे.”

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00