Home माझं पिंपरी चिंचवड Drug Awareness Workshop:इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडतर्फे अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यशाळा

Drug Awareness Workshop:इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडतर्फे अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यशाळा

इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडतर्फे दीनदयाळ विद्यालय, संत तुकाराम नगर येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली. स्माईल फाउंडेशनचे हर्षल जोशी यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवनाचा संदेश दिला.

by Admin
Spread the love

पिंपरी : इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडतर्फे दीनदयाळ विद्यालय, संत तुकाराम नगर येथे इयत्ता दहावीच्या ८० विद्यार्थ्यांसाठी अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात (Drug Awareness Workshop) आली.

 

कार्यशाळेत श्री. सुनील सुकथनकर व सौ. सुमित्रा भावे यांनी निर्मित, अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांवरील पुरस्कारप्राप्त लघुपट विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला. त्यानंतर झालेल्या संवादात्मक सत्रात व्यसनाधीनतेचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम तसेच व्यसनमुक्त, निरोगी जीवनशैलीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात(Drug Awareness Workshop) आले.

 

स्माईल फाउंडेशनचे श्री. हर्षल जोशी यांनी मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर राहण्याचा, योग्य निर्णय घेण्याचा आणि जबाबदार नागरिक बनण्याचा संदेश दिला. या उपक्रमाला विद्यार्थी व शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद (Drug Awareness Workshop) लाभला.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00