(पिंपरी-चिंचवड) : पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणि घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणाची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पवना नदीपात्रातील पाण्याच्या विसर्गात वाढ करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला (Pavana Dam Updates)आहे.
शुक्रवारी (31 जुलै) दुपारी 3.30 वाजताच्या स्थितीनुसार पवना धरण 98 टक्के भरले असून सध्या नदीपात्रात 5,720 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र, धरणातील वाढती आवक लक्षात घेता हा विसर्ग तातडीने 8,000 क्युसेकपर्यंत वाढविण्यात येणार असल्याची माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाच्या पवना धरण प्रकल्पाने दिली (Pavana Dam Updates)आहे.
याशिवाय, पावसाचे प्रमाण आणि धरणातील येवा कायम राहिल्यास विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवत तो 15 हजार क्युसेकपर्यंत नेण्याचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे. विसर्गात होणाऱ्या प्रत्येक बदलाची माहिती जलसंपदा विभागाकडून वेळोवेळी जाहीर करण्यात येणार (Pavana Dam Updates)आहे.
सततच्या पावसामुळे पवना नदी, ओढे आणि नाल्यांतील पाणीपातळीत अचानक वाढ होण्याची शक्यता असून नदीकाठच्या सखल भागांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे पवना नदी खोऱ्यातील ग्रामस्थ, नागरिक, शेतकरी आणि लाभधारकांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले (Pavana Dam Updates)आहे.
प्रशासनाने नागरिकांना नदीपात्रातील शेती अवजारे, कृषी पंप, इतर साहित्य तसेच जनावरे तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करून स्थानिक प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले (Pavana Dam Updates)आहे.
ही सूचना पवना धरण प्रकल्प, पवनानगर येथील पूर नियंत्रण कक्षामार्फत जारी करण्यात आली (Pavana Dam Updates)आहे.

