Home माझं पिंपरी चिंचवड PCMC Toilet Policy:पिंपरी-चिंचवडमध्ये लवकरच सर्वसमावेशक ‘शौचालय धोरण’; स्थायी समितीची मान्यता

PCMC Toilet Policy:पिंपरी-चिंचवडमध्ये लवकरच सर्वसमावेशक ‘शौचालय धोरण’; स्थायी समितीची मान्यता

महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांच्या गरजांना प्राधान्य; शहरातील स्वच्छता व्यवस्था होणार अधिक सक्षमपिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसमावेशक शौचालय धोरणाला स्थायी समितीची मंजुरी. महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांसाठी आधुनिक सुविधा, डिजिटल मॅपिंग आणि PPP मॉडेलचा समावेश.

by Admin
Spread the love

(पिंपरी, प्रतिनिधी दि. २९ ): पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील वाढते शहरीकरण आणि लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या सर्वसमावेशक ‘पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शौचालय धोरणा’ला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या महत्त्वपूर्ण धोरणास मंजुरी देण्यात आली.

 

शहरातील सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांची संख्या वाढविणे, त्यांची नियमित देखभाल, तसेच उघड्यावर शौचास जाण्याची प्रवृत्ती पूर्णपणे रोखणे हा या धोरणाचा मुख्य उद्देश आहे.

 

या धोरणामध्ये महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि तृतीयपंथी नागरिकांसाठी सर्वसमावेशक सुविधा, शौचालयांचे नियोजन, पाणीपुरवठा, मलनिसारण, प्रकाशयोजना, सुरक्षा, दिव्यांगस्नेही रचना, डिजिटल मॅपिंग, तक्रार निवारण यंत्रणा तसेच सार्वजनिक-खासगी सहभाग (PPP) या बाबींचा समावेश करण्यात आला आहे.

 

स्थायी समितीची मान्यता मिळाल्यानंतर हे धोरण अंतिम मंजुरीसाठी महापालिका सभेपुढे सादर करण्यात येणार आहे.

 

याबाबत बोलताना स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे म्हणाले, “वेगाने विकसित होणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि सन्मानजनक सुविधा उपलब्ध करून देणे ही आमची प्राथमिकता आहे. महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांच्या गरजांचा विशेष विचार करून तयार करण्यात आलेले हे धोरण शहराच्या स्वच्छता व आरोग्य व्यवस्थापनासाठी महत्त्वाचे ठरेल.”

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00