Home माझं पिंपरी चिंचवड Appu Ghar Nigdi:निगडीतील अप्पु घर होणार हायटेक; १८.६० कोटींच्या गुंतवणुकीतून आधुनिक अम्युझमेंट पार्क

Appu Ghar Nigdi:निगडीतील अप्पु घर होणार हायटेक; १८.६० कोटींच्या गुंतवणुकीतून आधुनिक अम्युझमेंट पार्क

पिंपरी-चिंचवडच्या निगडीतील अप्पु घर अम्युझमेंट पार्कचे १८.६० कोटींच्या खासगी गुंतवणुकीतून आधुनिकीकरण होणार. अत्याधुनिक राईड्स, एआर-व्हीआर झोन, डिजिटल सुविधा आणि पर्यटनाला नवी चालना मिळणार.

by Admin
Spread the love

पिंपरी, दि. २९ : पिंपरी-चिंचवडकरांच्या गेल्या साडेतीन दशकांच्या आठवणींशी जोडले गेलेले निगडी येथील इंदिरा गांधी उद्यानातील ‘अप्पु घर’ (Appu Ghar) अम्युझमेंट पार्क आता अत्याधुनिक स्वरूपात विकसित करण्यात येणार आहे. सुमारे १८ कोटी ६० लाख रुपयांच्या खासगी गुंतवणुकीतून या पार्कचा संपूर्ण कायापालट होणार असून, यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी उपसूचनांसह मंजूर केल्याची माहिती (Appu Ghar Nigdi)दिली.

शहरातील सर्वात जुने मनोरंजन उद्यान म्हणून ओळख असलेल्या ‘अप्पु घर’मधील बहुतांश राईड्स २० ते ३५ वर्षे जुन्या झाल्या आहेत. कालबाह्य झालेल्या यंत्रसामग्रीमुळे पर्यटकांची संख्या घटत असून, महसुलावरही त्याचा परिणाम होत आहे. आधुनिक पर्यटनस्थळांशी स्पर्धा करण्यासाठी या उद्यानाचे आधुनिकीकरण आवश्यक असल्याचे महापालिका प्रशासनाचे मत (Appu Ghar Nigdi)आहे.

कोरोना महामारीच्या काळात १६ मार्च २०२० ते जानेवारी २०२२ या कालावधीत ‘अप्पु घर’ बंद ठेवावे लागले होते. त्यामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीचा विचार करून करारातील अटींनुसार भाडेवाढीसह करार संपल्यानंतर अतिरिक्त दोन वर्षांची मुदतवाढ देण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला (Appu Ghar Nigdi) आहे.

मे. पुष्पक अम्युझमेंटच्या माध्यमातून साकारण्यात येणाऱ्या या प्रकल्पामध्ये अनेक आधुनिक आकर्षणांची भर पडणार आहे. यामध्ये लॉग फ्ल्युम (पाण्यावरील घसरगुंडी), फ्लॉइंग सिनेमा, ३६० अंश इमर्सिव्ह डोम, हॉरर हाऊस, मिरर मेझ, इन्फिनिटी टनल, कृत्रिम नायगारा धबधबा, किड्स ट्रॅफिक पार्क, आर्केड गेम्स, एआर-व्हीआर झोन तसेच इंटरॅक्टिव्ह सेल्फी झोनचा समावेश (Appu Ghar Nigdi)असेल.

याशिवाय ‘नेचर थीम’ आणि ‘किड्स थीम’वर आधारित उद्यानाचे सुशोभीकरण, डिजिटल तिकीट प्रणाली, क्यू मॅनेजमेंट, स्मार्ट पार्किंग, आधुनिक फूड कोर्ट, पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि सक्षम ड्रेनेज व्यवस्था उभारण्यात येणार (Appu Ghar Nigdi) आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत फायर सेफ्टी, सीसीटीव्ही देखरेख, आपत्कालीन यंत्रणा, स्ट्रक्चरल सेफ्टी, गेस्ट इन्शुरन्स आणि सार्वजनिक दायित्व विमा यांसह सर्व आवश्यक सुरक्षा मानकांची अंमलबजावणी बंधनकारक करण्यात येणार (Appu Ghar Nigdi)आहे.

या प्रकल्पाचे काम पुढील १२ ते १८ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. करारानुसार पहिल्या वर्षी महापालिकेला १० टक्के आणि त्यानंतर दरवर्षी ५ टक्के भाडेवाढ मिळणार आहे. या प्रकल्पामुळे पिंपरी-चिंचवडच्या पर्यटन क्षेत्राला नवी ओळख मिळण्याबरोबरच स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मिती आणि व्यवसायांना चालना मिळेल, असा विश्वास स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी व्यक्त (Appu Ghar Nigdi)केला.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00