Home माझं पिंपरी चिंचवड Legendary Wahida Raheman :चला चला जाऊ सिनेमाला..सिने अभिनेत्री वहिदा रहमान यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा आढावा (भाग – २)–सुरेश कंक

Legendary Wahida Raheman :चला चला जाऊ सिनेमाला..सिने अभिनेत्री वहिदा रहमान यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा आढावा (भाग – २)–सुरेश कंक

'चला चला जाऊ सिनेमाला' भाग २ मध्ये वहिदा रहमान यांच्या गाईड, प्रेम पुजारी, नीलकमल, कभी कभी ते मशालपर्यंतच्या अजरामर चित्रपट प्रवासाचा आढावा.

by Admin
Spread the love

(सुरेश कंक )अवघ्या सोळाव्या वर्षी चित्रपटसृष्टीत प्रवेश केलेल्या वहिदा रहमान या पुढील दशकात अधिक परिपक्व अभिनेत्री म्हणून समोर आल्या. १९६० ते १९७० हे दशक त्यांच्या कारकिर्दीतील सुवर्णकाळ ठरला. या काळात त्यांनी अनेक दर्जेदार आणि अजरामर चित्रपट (Legendary Wahida Raheman)दिले.

 

भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम चित्रपटांपैकी गणला जाणारा “गाईड” हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरला. या चित्रपटातील रोझी या नर्तिकेची भूमिका त्यांनी अप्रतिम साकारली. “आज फिर जीने की तमन्ना है”, “पिया तोसे नैना लागे रे” आणि “मोसे छल किये जाय…” या गीतांमधील त्यांचा अभिनय आणि कथ्थक नृत्य आजही रसिकांच्या स्मरणात (Legendary Wahida Raheman)आहे.

 

यानंतर **”पत्थर के सनम”**मध्ये त्यांनी मनोज कुमार यांच्यासोबत काम केले. लक्ष्मीकांत–प्यारेलाल यांच्या संगीताने सजलेला हा चित्रपटही लोकप्रिय ठरला. “बता दूँ क्या लाना…” आणि “कोई नहीं है फिर भी…” ही गीते आजही रसिक आवडीने(Legendary Wahida Raheman) ऐकतात.

 

याच काळात अभिनय सम्राट दिलीप कुमार यांच्यासोबत “आदमी”, “दिल दिया दर्द लिया” आणि “राम और श्याम” हे तीन महत्त्वाचे चित्रपट त्यांनी केले. दिलीप कुमार यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यासमोरही वहिदा रहमान यांनी आपल्या सहज अभिनयाची वेगळी छाप पाडली. “कल के सपने आज भी आना…”, “कारी बदरिया…” आणि “मैं हूँ साकी तू है शराबी…” ही गीते त्याकाळी विशेष (Legendary Wahida Raheman)गाजली.

 

**”नीलकमल”**मध्ये त्यांनी राजकुमार, मनोज कुमार आणि बलराज साहनी यांच्यासोबत प्रभावी भूमिका केली. “बाबुल की दुआएँ लेती जा…” हे भावस्पर्शी गीत आजही प्रत्येक विवाहसोहळ्यात ऐकू येते. “हे रोम रोम में बसनेवाले राम…” या भक्तिगीतात मुस्लिम समाजातील असूनही त्यांनी अत्यंत तन्मयतेने भूमिका साकारून अभिनयाला धर्माच्या चौकटी नसतात, हे दाखवून दिले. पुण्यातील अलंकार चित्रपटगृहाची सुरुवातही याच चित्रपटाने झाली होती, ही विशेष(Legendary Wahida Raheman) बाब.

 

“धरती” आणि “शतरंज” या चित्रपटांत त्यांची जोडी राजेंद्र कुमार यांच्यासोबत जमली. “खुदा भी आसमाँ से…” या गीतातील त्यांचा मूक अभिनय विशेष उल्लेखनीय (Legendary Wahida Raheman)ठरतो.

 

देव आनंद यांच्या नवकेतन बॅनरखालील **”प्रेम पुजारी”**मध्ये पुन्हा एकदा वहिदा रहमान यांच्यावर विश्वास टाकण्यात आला. एस. डी. बर्मन यांच्या मधुर संगीताने आणि कवी नीरज यांच्या शब्दांनी सजलेली “शोखियों में घोला जाए…” आणि “रंगीला रे…” ही गीते आजही सदाबहार मानली जातात. विशेष म्हणजे “रंगीला रे…” हे गीत त्या काळच्या बिनाका गीतमाला वार्षिक कार्यक्रमात प्रथम क्रमांकावर (Legendary Wahida Raheman)होते.

 

“दर्पण”, “मन की आँखें”, “मन मंदिर”, “खामोशी” अशा चित्रपटांतूनही त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या. राजेश खन्ना यांच्यासोबतचा “खामोशी” हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा (Legendary Wahida Raheman)ठरला.

 

त्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीवर अमिताभ बच्चन यांचा काळ सुरू झाला. १९७६ मध्ये प्रदर्शित झालेल्या **”कभी कभी”**मध्ये त्यांनी अमिताभ यांच्या पत्नीची भूमिका साकारली. “मेरे घर आयी एक नन्ही परी…” हे साहिर लुधियानवी यांच्या शब्दांनी सजलेले गीत आजही तितकेच(Legendary Wahida Raheman) भावते.

 

अमिताभ बच्चन यांच्यासोबत “अदालत”, “त्रिशूल”, “नमक हलाल” आणि “कुली” या यशस्वी चित्रपटांत त्यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या. त्यानंतर “चांदनी”, “लम्हे”, “मशाल”, “मकसद”, “धरम काटा”, “हिम्मतवाला”, “ज्योती बने ज्वाला”, “रंग दे बसंती” आणि **”दिल्ली-६”**पर्यंत त्यांचा अभिनय प्रवास अविरत सुरू (Legendary Wahida Raheman)राहिला.

 

“मशाल” चित्रपटातील दिलीप कुमार आणि वहिदा रहमान यांच्यावर चित्रित झालेला पावसातील प्रसंग आजही अंगावर शहारे आणतो. “अरे कोई है… मेरी बीवी यहाँ मर रही है…” हा दिलीप कुमार यांचा आर्त संवाद आणि त्याला वहिदा रहमान यांनी दिलेली अभिनयाची साथ हा हिंदी चित्रपटसृष्टीतील अविस्मरणीय क्षण ठरला (Legendary Wahida Raheman)आहे.

 

सहा दशकांहून अधिक काळ रुपेरी पडद्यावर आपल्या सहज, संयत आणि प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या वहिदा रहमान यांना मनःपूर्वक सलाम. त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, हीच (Legendary Wahida Raheman)शुभेच्छा.

 

पुन्हा भेटू… पुढील शुक्रवारी!

 

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00