Home प्रेरणा / यशकथा Chapekar Brothers:चापेकर बंधूंच्या बलिदानातून प्रेरणा घेऊन मानवतावादी भारत घडविण्याचा संकल्प करूया – पांडुरंग बलकवडे

Chapekar Brothers:चापेकर बंधूंच्या बलिदानातून प्रेरणा घेऊन मानवतावादी भारत घडविण्याचा संकल्प करूया – पांडुरंग बलकवडे

पुण्यातील गणेशखिंड ते चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालयापर्यंत मशाल दौड व बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी चापेकर बंधूंच्या बलिदानाचे स्मरण करून मानवतावादी, विज्ञाननिष्ठ भारत घडविण्याचे आवाहन केले.

by Admin
Spread the love

(पिंपरी,प्रतिनिधी दि. २२ जून) : जुलमी ब्रिटिश अधिकारी रॅण्डचा वध करून देशस्वातंत्र्याचा संकल्प करणाऱ्या क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या बलिदानाचे स्मरण करत भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त, दहशतवादमुक्त आणि विज्ञाननिष्ठ मानवतावादी भारत घडविण्याचा संकल्प करण्याचे आवाहन ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी (Chapekar Brothers)केले.

 

क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या वतीने गणेशखिंड येथील चापेकर बंधू पुतळ्यापासून चिंचवडमधील क्रांतिवीर चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालयापर्यंत आयोजित मशाल दौड आणि बाईक रॅलीचे उद्घाटन रविवारी (२१ जून) बलकवडे यांच्या हस्ते झाले. यावेळी समितीचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, कार्यवाह ॲड. सतीश गोरडे, उपाध्यक्ष डॉ. अशोक नगरकर, डॉ. शकुंतला बन्सल, डॉ. नीता मोहिते, अतुल आडे आणि ॲड. अक्षय कदम उपस्थित(Chapekar Brothers) होते.

 

प्रास्ताविकात गिरीश प्रभुणे यांनी चापेकर बंधूंच्या क्रांतिकार्याचा वारसा जपण्याची गरज अधोरेखित केली. आपल्या भाषणात पांडुरंग बलकवडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक, वासुदेव बळवंत फडके यांच्यापासून प्रेरणा घेत देशासाठी बलिदान देणाऱ्या असंख्य क्रांतिकारकांचे योगदान मोलाचे असल्याचे सांगितले. २२ जून हा दिवस चापेकर बंधूंच्या हौतात्म्याचे स्मरण करून राष्ट्रसेवेचा संकल्प करण्याचा दिवस असल्याचे त्यांनी नमूद (Chapekar Brothers) केले.

 

कार्यक्रमानंतर गणेशखिंड, विद्यापीठ रस्ता, औंध गाव, काळेवाडी चौक, तापकीर चौक, डॉ. हेडगेवार पथ, केशवनगर शाळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, क्रांतिवीर चापेकर चौक, गांधीपेठ आणि चापेकर उर्दू शाळा मार्गे क्रांतिवीर चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालयापर्यंत मशाल दौड व बाईक रॅली काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषेतील महिला, युवक आणि विविध वयोगटातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून (Chapekar Brothers)गेला.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. सतीश गोरडे यांनी केले, तर डॉ. अशोक नगरकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सागर शेवाळे, हर्षदा धुमाळ, प्राजक्ता कदम, विशाल पाटील, किरण गायकवाड, विक्रम कुसाळकर, रोहित मोहिते, भीमराव जाधव, हृषीकेश हंकारे, रोहित बडे, विशाल कांबळे, अनिकेत कांबळे आणि महेश नरवडे यांनी विशेष परिश्रम (Chapekar Brothers)घेतले.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00