पिंपरी, दि. १६ जून २०२६ : न्यू इंग्लिश स्कूल, माण (ता. मुळशी) आणि दिलासा संस्था, पिंपळे गुरव यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेचा पहिला दिवस प्रार्थना, वृक्षारोपण, कविता सादरीकरण आणि एसएससी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याने उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम संस्मरणीय( Dilasa Sanstha) ठरला.
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी परिसर स्वच्छता मोहीम राबवून शाळेचा परिसर स्वच्छ केला. तसेच कार्यक्रमासाठी रंगीत खडूंनी फळ्यावर आकर्षक सजावट केली आणि वृक्षारोपणासाठी आवश्यक तयारी केली. पाहुण्यांच्या स्वागतासाठी पारंपरिक पद्धतीने हळद-कुंकू, निरांजन आणि फुलांच्या ताटाची व्यवस्था करण्यात आली(Dilasa Sanstha) होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिका शोभा जोशी होत्या. शिवव्याख्यात्या सुलभा सत्तुरवार यांनी उद्घाटक म्हणून उपस्थिती लावली, तर ज्येष्ठ कवी व गझलकार सुहास घुमरे प्रमुख पाहुणे होते. याशिवाय ज्येष्ठ कवयित्री राधाबाई वाघमारे, दिलासा संस्थेचे सुभाष चव्हाण, लेखक नारायण कुंभार, ह.भ.प. अशोकमहाराज गोरे, मुरलीधर दळवी, मुख्याध्यापक अंबादास रोडे, ग्रामपंचायत सदस्य विजय भोसले, उद्योजक संदीप ओझरकर, ग्रामपंचायत सदस्य पंडित गवारे आणि दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक आदी मान्यवर उपस्थित (Dilasa Sanstha)होते.
मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण आणि सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सुभाष चव्हाण यांनी शंखनाद करून वातावरण भक्तिमय केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सामूहिक प्रार्थना सादर केली. संभाजी थिटे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट (Dilasa Sanstha)केली.
यावेळी वैकुंठवासी मुरलीधर कंक (मास्तर) यांच्या स्मरणार्थ एसएससी परीक्षेत यश संपादन केलेल्या पहिल्या पाच विद्यार्थ्यांचा शाल, पुस्तक, प्रशस्तिपत्र आणि रोख पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. शुभम अंकुश माने (प्रथम), आरती किशोर गोसावी (द्वितीय), रितेश तुकाराम मैत्रे (तृतीय), अनुराधा विठ्ठल शेंडगे (चतुर्थ) आणि रौनक उदलसिंग राठोड (पंचम) या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात (Dilasa Sanstha)आला.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सुलभा सत्तुरवार यांनी एकाग्रतेने अभ्यास करण्यासोबतच अवांतर वाचनाची सवय लावण्याचे आणि आहार, व्यायाम व विश्रांती यांचा समतोल राखण्याचे आवाहन केले. सुहास घुमरे यांनी शालेय आठवणींना उजाळा देत कवितांचे सादरीकरण केले. मुख्याध्यापक अंबादास रोडे, नारायण कुंभार, राधाबाई वाघमारे आणि सुरेश कंक यांनीही मनोगत व्यक्त (Dilasa Sanstha)केले.
अध्यक्षीय भाषणात शोभा जोशी यांनी विद्यार्थ्यांना सहभागी करून घेत गेय कवितांचे सादरीकरण केले. यावेळी पिंपरी-चिंचवडमधील साहित्यिकांनी शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तके भेट (Dilasa Sanstha)दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शीतल टकले, विजय भांगरे, मंगल गायकवाड, शुभम गायकवाड, ज्योती गायकवाड, बाळू जाधव, सुदाम केळकर तसेच टीसीएस कंपनीच्या प्रतिनिधींनी विशेष योगदान दिले. गोकुळ गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले, तर साधना शिंदे यांनी आभार प्रदर्शन (Dilasa Sanstha)केले.
