Home मनोरंजन Anup More Foundation :निगडीत ‘रहे ना रहे ना हम’ सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन

Anup More Foundation :निगडीत ‘रहे ना रहे ना हम’ सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन

अनुप मोरे सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे निगडीतील ग. दि. माडगुळकर नाट्यगृहात ११ जून रोजी ‘रहेना रहेना हम’ सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन. कप-बशी म्युझिकल टीमची विशेष प्रस्तुती.

by Admin
Spread the love

निगडी : अनुप मोरे सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने रसिकांसाठी एक सुरेल आणि अविस्मरणीय सांगीतिक पर्वाची मेजवानी आयोजित करण्यात आली आहे. ‘आपला आवाज आपली सखी’ आणि ‘स्वरा म्युझिकल’ प्रस्तुत “रहे ना रहे ना हम” हा विशेष सांगीतिक कार्यक्रम गुरुवार, ११ जून २०२६ रोजी सायंकाळी ४.४५ वाजता ग. दि. माडगुळकर नाट्यगृह, निगडी प्राधिकरण येथे होणार (Anup More Foundation) आहे.

 

या कार्यक्रमात महाराष्ट्रातील लोकप्रिय ‘कप-बशी’ म्युझिकल टीम आपल्या सुमधुर गायनाने आणि दर्जेदार संगीत सादरीकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध करणार आहे. जुन्या आणि नव्या गाण्यांचा बहारदार संगम असलेल्या या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी परिसरातील संगीतप्रेमींना सहकुटुंब उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले (Anup More Foundation)आहे.

 

कार्यक्रमासाठी प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुरेल मैफलीची शोभा वाढवावी, असे आवाहन अनुप मोरे सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले (Anup More Foundation)आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00