Home आरोग्य Swimming Pool Contract:मोहननगर जलतरण तलाव ठेकेदारी पद्धतीने; शुल्कवाढ नसल्याचा पालिकेचा दावा

Swimming Pool Contract:मोहननगर जलतरण तलाव ठेकेदारी पद्धतीने; शुल्कवाढ नसल्याचा पालिकेचा दावा

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोहननगर येथील राजर्षी शाहू महाराज जलतरण तलावाचे संचालन ठेकेदारी पद्धतीने होणार आहे. मात्र सभासद व दैनंदिन शुल्कात कोणतीही वाढ होणार नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :मोहननगर येथील श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज जलतरण तलावाचे संचालन आता ठेकेदारी पद्धतीने करण्यात येणार असून, यामुळे नागरिकांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडणार नसल्याचा दावा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्रीडा विभागाने केला आहे. उपआयुक्त (क्रीडा) पंकज पाटील यांनी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांना दिलेल्या लेखी पत्रातून ही माहिती स्पष्ट करण्यात आली (Swimming Pool Contract) आहे.

 

महापालिकेच्या माहितीनुसार, शहरातील जलतरण तलावांमध्ये पाणी शुद्धीकरण प्रक्रिया यापूर्वीपासूनच ठेकेदारामार्फत केली जात होती. तसेच ‘मेस्को’ संस्थेमार्फत जीवरक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. या दोन्ही सेवांसाठी संबंधित ठेकेदारांना महापालिकेकडून मासिक बिलांचे भुगतान केले जात (Swimming Pool Contract) होते.

 

मोहननगर येथील जलतरण तलावाचे स्थापत्य काम सप्टेंबर २०२५ अखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंत्यांकडून प्राप्त झाल्यानंतर हा तलाव पुढील तीन वर्षांसाठी भाडे तत्वावर चालविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले (Swimming Pool Contract) आहे.

 

पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, जलतरण तलाव खासगी पद्धतीने चालविण्यास दिला असला तरी सभासद शुल्क किंवा दैनंदिन शुल्कामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांना अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार नसल्याचा दावा प्रशासनाने केला (Swimming Pool Contract)आहे.

 

तसेच जलतरण तलावाची दैनंदिन स्वच्छता, देखभाल आणि आवश्यक सुविधा सुरळीत ठेवण्याच्या सूचना संबंधित एजन्सीला देण्यात आल्या आहेत. या कामकाजावर संबंधित क्षेत्रीय कार्यालयातील क्रीडा पर्यवेक्षकांमार्फत दररोज नियंत्रण ठेवले जाणार असल्याचेही महापालिकेने नमूद केले (Swimming Pool Contract) आहे.

 

जलतरण तलावाच्या व्यवस्थापनात आवश्यक खबरदारी घेतली जात असून, नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपआयुक्त पंकज पाटील यांनी केले (Swimming Pool Contract) आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00