Home माझं पिंपरी चिंचवड NCP Politics:भोसरीत राजकीय भूकंप! “महेशदादांना मदत केली”; मंगलाताई कदम यांच्या वक्तव्याने खळबळ

NCP Politics:भोसरीत राजकीय भूकंप! “महेशदादांना मदत केली”; मंगलाताई कदम यांच्या वक्तव्याने खळबळ

“गेली १५ वर्षे विलास लांडे यांना पराभूत करण्यासाठी महेशदादांना मदत केली...” मंगलाताई कदम यांच्या एका वक्तव्याने भोसरीच्या राजकारणात मोठी खळबळ! राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष पुन्हा चर्चेत.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :भोसरीच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय स्फोट झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा माजी महापौर मंगलाताई कदम यांच्या एका वक्तव्याने संपूर्ण शहरात चर्चांना उधाण आले आहे. “गेली १५ वर्षे मी विलास लांडे यांच्या विरोधात महेशदादांना मदत करत आहे,” अशी थेट कबुली त्यांनी जाहीर मंचावर दिल्यानंतर भोसरीतील राजकीय समीकरणांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा उघडपणे समोर आला (NCP Politics) आहे.

 

विशेष म्हणजे, आमदार महेश लांडगे यांच्यावर टीका करताना मंगलाताई कदम यांनी नकळत स्वतःच पक्षविरोधी भूमिका मान्य केल्याची चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या असूनही त्यांनी पक्षाचे माजी आमदार विलास लांडे यांच्या विरोधात भाजपचे आमदार महेश लांडगे यांना मदत केल्याचे स्पष्टपणे सांगितल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली (NCP Politics) आहे.

 

भोसरी विधानसभा मतदारसंघात महेश लांडगे आणि विलास लांडे यांच्यातील संघर्ष हा कायम चर्चेचा विषय राहिला आहे. अपक्ष आमदार म्हणून दमदार एंट्री घेतल्यानंतर महेश लांडगे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून मतदारसंघात मजबूत संघटन उभे केले. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजी, अंतर्गत नाराजी आणि स्थानिक पातळीवरील संघर्ष सातत्याने समोर येत राहिले(NCP Politics) आहेत.

 

मंगलाताई कदम यांच्या या धक्कादायक वक्तव्यानंतर राष्ट्रवादीतील पडद्यामागील राजकारण उघड झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. विरोधी पक्षातील नेत्याला मदत केल्याची उघड कबुली ही केवळ राजकीय विधान नसून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठा संदेश असल्याचे मानले जात (NCP Politics) आहे.

 

दरम्यान, कदम कुटुंब आणि भाजप यांच्यातील जवळीक यापूर्वीही चर्चेत होती. मागील महापालिका निवडणुकीत मंगलाताई कदम यांचे पुत्र कुशाग्र कदम यांनी भाजपमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवली आणि नगरसेवक म्हणून विजयही मिळवला होता. त्यामुळे आता मंगलाताईंच्या वक्तव्यामुळे त्या चर्चांना अधिकच खतपाणी मिळाले (NCP Politics) आहे.

 

या सर्व घडामोडींनंतर संभाजीनगर परिसरातील एका कार्यक्रमात राजकीय वातावरण आणखी तापले. आमदार महेश लांडगे कार्यक्रमातून बाहेर पडत असताना मंगलाताई कदम यांनी कार्यकर्त्यांसह जोरदार घोषणाबाजी केली. प्रभाग क्रमांक ११ मधील नगरसेवक आणि भाजपविरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी नगरसेवक निलेश नेवाळे आणि मंगलाताई कदम यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याची माहिती समोर आली (NCP Politics) आहे.

 

“आमदारांचे पत्र असूनही स्थानिक नगरसेवक विकासकामांमध्ये अडथळे निर्माण करत आहेत,” असा आरोप करत मंगलाताई कदम यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र, या संपूर्ण राजकीय गदारोळात सर्वाधिक चर्चेत राहिले ते त्यांचे “महेशदादांना मदत केली” हे (NCP Politics) विधानच.

 

भोसरीच्या राजकारणात आगामी काळात याचे मोठे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात असून राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले (NCP Politics) आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00