Home गुन्हे Koyta Gang Attack :शिवार चौकात ‘कोयता गॅंग’चा उच्छाद; खंडणी न दिल्याने हल्ला, दुकान-वाहनांची तोडफोड

Koyta Gang Attack :शिवार चौकात ‘कोयता गॅंग’चा उच्छाद; खंडणी न दिल्याने हल्ला, दुकान-वाहनांची तोडफोड

पिंपळे सौदागरच्या शिवार चौकात कोयता गॅंगचा उच्छाद. खंडणी न दिल्याने रेस्टॉरंटवर हल्ला, एक जखमी, दुकान व वाहनांची तोडफोड. आरोपींचा शोध सुरू.

by Admin
Spread the love

(पिंपळे सौदागर, प्रतिनिधी दि. २१ ): पिंपळे सौदागर परिसरातील शिवार चौकात सोमवारी मध्यरात्री ‘कोयता गॅंग’ने दहशत माजवत रेस्टॉरंटवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. खंडणीची मागणी नाकारल्याच्या रागातून तिघा गुंडांनी ‘द मोमो वाला’ या रेस्टॉरंटमध्ये घुसून कोयत्याने हल्ला केला. या घटनेत एक जण जखमी झाला असून दुकानासह बाहेर उभ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात (Koyta Gang Attack) आली.

 

ही घटना सोमवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास घडली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, तिघे तरुण अचानक रेस्टॉरंटमध्ये घुसले आणि पैशांची मागणी करत कर्मचाऱ्यांना धमकावू लागले. मात्र, खंडणी देण्यास नकार मिळताच त्यांनी संतापाच्या भरात कोयते काढून हल्ला सुरू (Koyta Gang Attack)केला.

आरोपींनी दुकानातील साहित्याची नासधूस केली. तसेच बाहेर उभ्या असलेल्या वाहनांवरही कोयत्याने वार करत मोठे नुकसान केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले (Koyta Gang Attack) होते.

घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली (Koyta Gang Attack)आहे.

 

दरम्यान, या घटनेनंतर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

 

शहरात वाढत्या ‘कोयता गॅंग’च्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणात पोलिस प्रशासन कोणती ठोस कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले (Koyta Gang Attack) आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00