पिंपरी-चिंचवड, दि. २२ एप्रिल २०२६ : पिंपळे सौदागर येथील शिवार चौक परिसरातील मोमो दुकानावर कोयत्याने हल्ला करून दहशत माजवणाऱ्या तिघा आरोपींना सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. खंडणीची मागणी नाकारल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याचे समोर आले (Koyta Gang Attack )आहे.
अटक करण्यात आलेल्यांची नावे करण सतन कापरी (२०), सोपान गजानन बुलाखे (२१) आणि ओंकार उद्धव बाबर (२०) अशी आहेत. विवेक विनोद अंबोरे (१८) याचाही या प्रकारात सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी (Koyta Gang Attack )दिली.
सोमवारी मध्यरात्री कुणाल आयकॉन रोडवरील ‘द मोमो वाला’ दुकानात आरोपी मोटारसायकलवरून आले. त्यातील दोघांनी दुकानात घुसून फिर्यादीकडे ४ लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर एका आरोपीने कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न केला, तर दुसऱ्याने स्टूलने दुकानातील साहित्याची तोडफोड (Koyta Gang Attack )केली.
या घटनेत दुकानातील साहित्य, लॅपटॉप तसेच बाहेर उभ्या वाहनांचे नुकसान झाले असून एक जण जखमी झाला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघांना अटक केली असून पुढील तपास सुरू (Koyta Gang Attack )आहे.


