पिंपरी-चिंचवड (दि. ९ एप्रिल २०२६) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत सुमारे ५२ कोटी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराचा गंभीर आरोप समोर आला असून सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे सखोल चौकशीची मागणी केली (PCMC Scam News )आहे.
भापकर यांनी दिलेल्या निवेदनानुसार, महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांनी आर्थिक तरतूद नसतानाही विविध विभागांच्या कामांची कोट्यवधींची बिले परस्पर अदा केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे २९ ते ३१ मार्च २०२६ दरम्यान सुमारे ६० ते ७० कामांची बिले काढण्यात आल्याचे नमूद करण्यात आले (PCMC Scam News) आहे.
या प्रक्रियेत संबंधित विभाग प्रमुखांना माहिती न देता, काही नगरसेवकांच्या सह्यांच्या आधारे बिले मंजूर करण्यात आल्याचा आरोप असून, बँक ऑफ बडोदा येथील मुदत ठेवी मोडून ही रक्कम देण्यात आल्याचेही निवेदनात म्हटले(PCMC Scam News) आहे.
या प्रकरणात अधिकारी, ठेकेदार, सल्लागार व काही नगरसेवकांच्या संगनमताचा संशय व्यक्त करत, सर्व व्यवहारांची चौकशी करून दोषींवर प्रशासकीय तसेच फौजदारी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला (PCMC Scam News) आहे.
