निगडी प्राधिकरण – सरस्वती माध्यमिक विद्यालय, आकुर्डी (पुणे) येथील शिक्षिका, लेखिका आणि कवयित्री सौ. प्रतिमा काळे यांना “माय रमाई साहित्य भूषण पुरस्कार २०२६” ने सन्मानित करण्यात आले. लोणावळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा क्रमांक १ येथे झालेल्या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या तृप्तीताई देसाई आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात (May Ramai Award) आला.
सौ. काळे यांच्या साहित्यिक, शैक्षणिक, सामाजिक आणि पर्यावरण विषयक कार्याची दखल घेऊन जागतिक महिला दिन (८ मार्च) निमित्त हा पुरस्कार देण्यात आला. आदरणीय माता रमाई यांच्या नावाने दिला जाणारा हा सन्मान त्यांच्या बहुआयामी कार्याची पोचपावती मानला जात (May Ramai Award)आहे.
या पुरस्काराबद्दल पिंपरी-चिंचवड परिसरातील साहित्यिक, विविध साहित्य संस्था तसेच समाजातील विविध स्तरांतील मान्यवरांनी त्यांचे प्रत्यक्ष तसेच सामाजिक माध्यमांद्वारे अभिनंदन केले (May Ramai Award)आहे.
