पुणे जिल्ह्यातील चाकण येथे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात ३२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास आंबेठाण चौक परिसरात घडली असून त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृत महिलेचे नाव शोभा विजय वाघमारे असून त्या सध्या चाकण परिसरात वास्तव्यास (Stray Dog Attack ) होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्री शोभा वाघमारे या आंबेठाण चौकातील उड्डाणपुलाखालून सर्व्हिस रोडने जात असताना सहा ते सात भटक्या कुत्र्यांनी त्यांना घेरले. अचानक झालेल्या या हल्ल्यात कुत्र्यांनी त्यांच्यावर झडप घातली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, शोभा यांनी दगड उचलून कुत्र्यांना पळवून लावण्याचा आणि स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र कुत्र्यांच्या झुंडीसमोर त्यांचा प्रतिकार अपुरा (Stray Dog Attack ) पडला.
कुत्र्यांनी त्यांच्या हात, पाय, तोंड आणि मानेवर गंभीर चावे घेतल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. या भीषण हल्ल्यात अवघ्या १५ मिनिटांतच त्यांचा मृत्यू झाला. सकाळी त्यांचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळून आल्याने सुरुवातीला खून किंवा अत्याचाराचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर कुत्र्यांच्या हल्ल्यामुळेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट (Stray Dog Attack ) झाले.
दरम्यान, चाकण औद्योगिक वसाहत आणि शहर परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याची तक्रार नागरिकांकडून वारंवार केली जात आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत (Stray Dog Attack ) आहे.
