Home माझं पिंपरी चिंचवड Ekta Marathi Sammelan:पाडळी येथे ८ वे एकता मराठी साहित्य संमेलन; उद्घाटन पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते

Ekta Marathi Sammelan:पाडळी येथे ८ वे एकता मराठी साहित्य संमेलन; उद्घाटन पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते

बीड जिल्ह्यातील पाडळी येथे ८ वे एकता मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते होणार असून संमेलनाध्यक्षपदी माजी आमदार ॲड. उषाताई दराडे यांची निवड झाली आहे.

by Admin
Spread the love

पुणे : एकता फाउंडेशन, मराठवाडा साहित्य परिषद आणि समस्त पाडळीकर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ८ वे एकता मराठी साहित्य संमेलन पाडळी (ता. शिरूर कासार, जि. बीड) येथे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात संपन्न होणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते होणार असून संमेलनाध्यक्षपदी लेखिका व माजी आमदार ॲड. उषाताई दराडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली (Ekta Marathi Sammelan) आहे.

 

संमेलनाची सुरुवात २४ मार्च रोजी सकाळी ८ वाजता ग्रंथदिंडीने होणार आहे. या ग्रंथदिंडीत शाळकरी विद्यार्थी, लेझीम पथके, वारकरी भजनी मंडळ तसेच साहित्यप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. सकाळी १० वाजता उद्घाटन समारंभ पार पडणार असून यावेळी व्यंगचित्रकार सुहास पालिमकर आणि दीपक महाले यांच्या व्यंगचित्र प्रदर्शनाचे तसेच अनुराधा प्रकाशनाच्या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार(Ekta Marathi Sammelan) आहे.

 

या संमेलनात जीवनगौरव, उत्कृष्ट साहित्यकृती, आदर्श शिक्षक, समाजसेवक, पत्रकार आणि कर्तृत्ववान महिला पुरस्कारांचे वितरण होणार आहे. तसेच डॉ. अनिलसिंह तिवारी यांचा ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हा कार्यक्रम, लेखक भेट, निमंत्रितांचे कविसंमेलन आणि विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले (Ekta Marathi Sammelan) आहेत.

 

दुसऱ्या दिवशी २५ मार्च रोजी ‘नवीन शैक्षणिक धोरण – बांधू विद्यार्थ्यांच्या भविष्याचे तोरण’ या विषयावर शैक्षणिक परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये डॉ. योगेश सुरवसे, जमीर शेख आणि प्रशांत शिंदे सहभागी होणार आहेत. तसेच कथाकथन, विशेष मुलाखत, राज्यस्तरीय कविसंमेलन आणि ‘सन्मान भूमीपुत्रांचा’ या विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले (Ekta Marathi Sammelan) आहे.

 

दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात साहित्य, संस्कृती आणि शिक्षण क्षेत्रातील विविध कार्यक्रमांची मेजवानी साहित्यप्रेमींना मिळणार असल्याची माहिती आयोजकांनी (Ekta Marathi Sammelan) दिली.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00