प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड शहरातील शंभरहून अधिक सदनिका असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) कार्यान्वित ठेवणे बंधनकारक असतानाही १३१ सोसायट्यांमध्ये हा प्रकल्प बंद असल्याचे महापालिकेच्या तपासणीत उघड झाले आहे. यामुळे महापालिकेने संबंधित सोसायट्यांना नोटिसा बजावून तातडीने एसटीपी सुरू न केल्यास पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला (PCMC STP Issue)आहे.
शहराचा वेगाने विस्तार होत असल्याने पाण्याची मागणी सातत्याने वाढत आहे. सध्या महापालिकेकडून शहरवासीयांना दररोज सुमारे ६५० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणीपुरवठा केला जातो. तरीही अनेक मोठ्या सोसायट्यांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे काही सोसायट्यांचा पाण्यावरचा मासिक खर्च सव्वा लाख ते दीड लाख रुपयांपर्यंत जात असल्याची माहिती मिळत (PCMC STP Issue) आहे.
एकत्रित बांधकाम व विकास नियमावली (यूडीसीपीआर) नुसार २० हजार चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळ, शंभरहून अधिक सदनिका किंवा दररोज २० हजार लिटरपेक्षा जास्त पाण्याचा वापर करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्या, शैक्षणिक संस्था, औद्योगिक व व्यापारी आस्थापना, सरकारी व निमसरकारी कार्यालये तसेच हॉटेल्स यांना सांडपाण्याची प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे बंधनकारक(PCMC STP Issue) आहे.
महापालिकेच्या माहितीनुसार शहरात एकूण ४९४ मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या आहेत. त्यापैकी ३६३ सोसायट्यांमध्ये एसटीपी प्रकल्प कार्यान्वित आहेत. मात्र वारंवार सूचना देऊनही १३१ सोसायट्यांमध्ये विविध कारणांमुळे हे प्रकल्प बंद असल्याचे समोर आले (PCMC STP Issue)आहे.
महापालिकेकडून या सोसायट्यांना पहिली, दुसरी आणि काही ठिकाणी तिसरी नोटीसही देण्यात आली आहे. तरीही खर्च किंवा इतर कारणे देत काही सोसायट्या एसटीपी सुरू करत नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे(PCMC STP Issue) आहे.
सांडपाण्याची प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर केल्यास पिण्याच्या पाण्यावरील ताण कमी होण्यास मदत होते. एसटीपीमधून प्रक्रिया केलेले पाणी बागकाम, स्वच्छता तसेच इतर गैरपेय वापरासाठी उपयोगात आणता येते. त्यामुळे शहरातील पाणीटंचाई कमी करण्यासही मदत(PCMC STP Issue) होते.
एसटीपी कार्यान्वित ठेवून पाण्याचा पुनर्वापर करणाऱ्या सोसायट्यांना महापालिकेकडून मिळकतकरात सवलत देण्याची तरतूद आहे. तसेच या प्रकल्पासाठी सवलतीच्या दरात ग्रीन वीज मीटर उपलब्ध करून देण्यासाठीही महापालिका मदत करत (PCMC STP Issue)आहे.
कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांनी सांगितले की, ज्या सोसायट्यांमध्ये एसटीपी सुरू आहेत त्यांना सामान्य करात तीन टक्के सवलत दिली जाते. तसेच प्रकल्प सुरू करण्यासाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शनही महापालिकेकडून केले जात(PCMC STP Issue) आहे.
महापालिकेचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले की, एसटीपी सुरू करण्याबाबत सोसायट्यांना वारंवार आवाहन करण्यात आले असून त्यांच्या अडचणी समजून घेऊन सहकार्यही करण्यात आले आहे. मात्र १३१ सोसायट्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांना नोटिसा देण्यात आल्या (PCMC STP Issue)आहेत.
आगामी काही दिवसांत या सोसायट्यांमधील एसटीपी कार्यान्वित आहेत की नाही याची पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतरही प्रकल्प सुरू न केल्यास संबंधित सोसायट्यांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येईल, असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला (PCMC STP Issue)आहे.
