Home माझं पिंपरी चिंचवड Bjp pcmc Protest:निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आमदार महेश लांडगे यांच्याविरोधात अजित पवारांची बेछूट टीका; भाजप कार्यकर्त्यांचा तीव्र निषेध

Bjp pcmc Protest:निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आमदार महेश लांडगे यांच्याविरोधात अजित पवारांची बेछूट टीका; भाजप कार्यकर्त्यांचा तीव्र निषेध

पीएमपीएल, गृहकुल योजना, बीआरटी, उद्यान-शिक्षण घोटाळे व पीसीएनटी जमिनीवर गंभीर आरोप; ‘पिंपरी-चिंचवडमधील भ्रष्टाचारांवर अजित पवार मौन का?’ — भाजपचा सवाल

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड :आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उपमुख्यमंत्री अजित पवार हे आमदार महेश लांडगे यांच्याविरोधात सातत्याने बेछूट, तथ्यहीन आणि दिशाभूल करणारी टीका करत असल्याचा आरोप भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केला आहे. अजित पवार सत्तेत असताना पिंपरी-चिंचवड शहरात अनेक मोठे कथित भ्रष्टाचार झाले असून, त्या मुद्द्यांवर ते जाणीवपूर्वक मौन बाळगत असल्याचा दावा करत भाजप कार्यकर्त्यांनी या वक्तव्यांचा जाहीर निषेध (Bjp pcmc Protest )नोंदवला आहे.

सचिन काळभोर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पीसीएमटी आणि पीएमटी या परिवहन संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करून पीएमपीएलची स्थापना करण्यात आली. या प्रक्रियेत कोट्यवधी रुपयांचा अपव्यय झाला. पीसीएमटीमधील कर्मचाऱ्यांना महापालिकेत सामावून घेण्यात आले असले, तरी त्यांना पीएमपीएलच्या नियमांनुसार वेतन दिले जात असून सध्या २५६ कर्मचारी वेतनातील विसंगतीमुळे आर्थिक व मानसिक त्रास सहन करत आहेत. या चुकीच्या निर्णयांमुळे पीएमपीएल आर्थिक संकटात सापडल्याचा आरोपही त्यांनीBjp pcmc Protest) केला.

जवाहरलाल नेहरू पुनर्वसन योजनेअंतर्गत निगडी सेक्टर २२ मधील रेड झोन संरक्षण क्षेत्रात घरकुल प्रकल्प राबवण्यात आला. या प्रकल्पावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले; मात्र मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकल्पाला स्थगिती दिल्याने संपूर्ण खर्च वाया गेला. गेली १४–१५ वर्षे उलटूनही ९२० पात्र लाभार्थ्यांना घरकुल मिळालेले नाही. लाभार्थ्यांना न्यायालयीन प्रक्रियेत अडकवून वेठीस धरण्यात आल्याचा आरोप करत, हा प्रकल्प अजित पवारांच्या हट्टामुळेच रेटण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले( Bjp pcmc Protest)आहे.

निगडी ते दापोडी बीआरटी बस मार्ग हा केवळ नावापुरताच राहिला असून, या प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून सार्वजनिक निधी वाया घालवण्यात आल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. “बीआरटीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करण्यात आला,” असा थेट आरोप करण्यात (Bjp pcmc Protest)आला.

याशिवाय शहरातील उद्यानांची कामे, महापालिकेचे ठेके, विठ्ठल मूर्ती घोटाळा, शालेय शिक्षण विभागातील गैरव्यवहार, विद्यार्थ्यांना मोफत अन्न-बिस्किटे व गणवेश वाटप प्रकरणातही अजित पवार सत्तेत असताना भ्रष्टाचार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या घोटाळ्यांमुळे अखेर महापालिकेची शिक्षण मंडळ समिती बरखास्त करावी लागली, याकडेही लक्ष वेधण्यात आले(Bjp pcmc Protest) आहे.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण (पीसीएनटी) मार्फत १९७२ नंतर स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनी ताब्यात घेऊन विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करण्यात आल्याचा गंभीर आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. सुमारे ४२ हेक्टर जमीन ताब्यात घेतली असताना केवळ ११ हेक्टरवरच प्रत्यक्ष विकासकामे झाली असून, उर्वरित जमिनींवर अतिक्रमण व परस्पर खरेदी-विक्री व्यवहार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. आजतागायत ‘लँड डेव्हलपमेंट स्ट्रक्चर ऑडिट’ न झाल्याबाबतही सवाल उपस्थित करण्यात आला आहे. पुढे प्राधिकरण बरखास्त करून पीएमआरडीएत समाविष्ट करत हजारो कोटींच्या जमिनी कथितरीत्या परस्पर वाटप करण्यात आल्याचा आरोपही भाजप कार्यकर्त्यांनी( Bjp pcmc Protest)केला.

या पार्श्वभूमीवरच २०१७ साली पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आली. राष्ट्रवादीच्या कथित भ्रष्टाचाराला कंटाळून नागरिकांनी भाजपला संधी दिली, असा दावा सचिन काळभोर यांनी केला. त्यामुळेच अजित पवार आज अस्वस्थ होऊन आमदार महेश लांडगे यांच्यावर टीका करत असल्याचे त्यांनी (Bjp pcmc Protest)म्हटले आहे.

“भविष्यातही अजित पवार यांनी आमदार महेश लांडगे यांच्याविरोधात बेछूट आरोप सुरू ठेवले, तर त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. वेळ पडल्यास भोसरी विधानसभा मतदारसंघात घेराव घालून जाब विचारला जाईल. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता गप्प बसणार नाही,” असा इशारा देत भाजप कार्यकर्त्यांनी निवेदनाचा समारोप केला (Bjp pcmc Protest)आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00