Home माझं पिंपरी चिंचवड Rupinagar Talwade Election:रुपीनगर–तळवडे प्रभागातून शीतल वर्नेकर इच्छुक; सामाजिक कार्यातून पालिकेत प्रवेशाची तयारी

Rupinagar Talwade Election:रुपीनगर–तळवडे प्रभागातून शीतल वर्नेकर इच्छुक; सामाजिक कार्यातून पालिकेत प्रवेशाची तयारी

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रुपीनगर–तळवडे प्रभागातून केब्रिज स्कूलचे संचालक धनंजय वर्नेकर यांच्या पत्नी शीतल वर्नेकर पालिका निवडणुकीसाठी इच्छुक असल्याची माहिती. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग.

by Admin
Spread the love

शीतल वर्नेकर या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असून शिक्षण, महिला सक्षमीकरण, आरोग्यविषयक उपक्रम तसेच गरजू घटकांसाठी विविध उपक्रम राबवत आल्या आहेत. प्रभागातील नागरिकांशी थेट संपर्क ठेवत त्यांनी स्थानिक प्रश्नांची जाण ठेवली असून, त्यांच्या कार्यपद्धतीमुळे परिसरात त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली( Rupinagar Talwade Election)
आहे.

विशेष म्हणजे, भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या नेतृत्वशैलीला त्या आदर्श मानत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या माध्यमातून जनसेवेत सहभागी होण्याचा त्यांचा मानस असल्याचेही बोलले जात आहे. यासाठी त्यांनी गेल्या काही काळापासून प्रभागातील सामाजिक, शैक्षणिक आणि नागरी प्रश्नांचा सखोल अभ्यास करत तयारी(Rupinagar Talwade Election)
सुरू केली आहे.

रुपीनगर–तळवडे परिसर हा औद्योगिक, निवासी आणि नव्याने विकसित होणारा भाग असल्याने येथे पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणी आणि महिलांसाठीच्या सुविधांबाबत अनेक अपेक्षा आहेत. या पार्श्वभूमीवर, शिक्षण क्षेत्रातील अनुभव आणि सामाजिक कार्याचा वारसा लाभलेल्या शीतल वर्नेकर यांची उमेदवारी प्रभागात चर्चेचा विषय ठरत( Rupinagar Talwade Election)
आहे.

महापालिका निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच इच्छुक उमेदवार मैदानात उतरू लागल्याने, रुपीनगर–तळवडे प्रभागातील राजकीय समीकरणे पुढील काळात अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत (Rupinagar Talwade Election)
आहेत.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00