पिंपरी प्रतिनिधी – इंद्रायणी नदी स्वच्छतेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आयोजित करण्यात येणारा ‘रिव्हर सायक्लोथॉन 2025’ उपक्रम यावर्षी विशेष आकर्षण ठरणार आहे. वारकरी परंपरा, पर्यावरण संवर्धन आणि शिवकालीन शौर्य यांचा संगम घडवणारा ‘शिव-शंभू यशोगाथा’ हा भव्य कार्यक्रम यामध्ये रंगणार असून, उपस्थित सायकलपटू आणि नागरिकांसाठी हा एक वेगळाच अनुभव (River Cyclothan 2025 )ठरणार आहे.
आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून दरवर्षी इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉनचे आयोजन केले जाते. यंदा रविवार, 23 नोव्हेंबर रोजी पहाटे 6 वाजता ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’’ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक परिसरातून सायक्लोथॉनची सुरुवात होईल. त्याच वेळी मर्दानी कला, ढोल-ताशांचे सादरीकरण, शिवकालीन शिलेदारांचे संचलन आणि मशाल-दिवटी नृत्य अशा सादरीकरणांनी संपूर्ण परिसर शिवगौरवाच्या (River Cyclothan 2025) प्रतिध्वनीने दुमदुमून जाईल.
छत्रपती संभाजी महाराजांच्या जगातील सर्वात उंच पुतळ्यास मानाचा मुजरा देण्यासाठी हजारो शिवप्रेमी, सायकलस्वार आणि नागरिक उत्साहाने सहभागी झाले. इतिहास आणि पर्यावरण संवर्धनाचा अनोखा मिलाफ घडवत ‘शिव-शंभू यशोगाथा’ हे सायक्लोथॉनचे प्रमुख आकर्षण ठरले (River Cyclothan 2025)आहे.
35 हजार सायकलपटूंची उत्स्फूर्त नोंदणी
अविरत श्रमदानचे डॉ. निलेश लोंढे म्हणाले, “शिव-शंभू यशोगाथा हा कार्यक्रम केवळ मनोरंजन नाही; तर आपल्या पराक्रमी इतिहासाची जाणीव आणि संस्कृतीचे स्मरण आहे. या प्रेरणेमुळे नदी स्वच्छतेच्या कार्यात अधिक लोक सहभागी होतील. इंद्रायणी ही आपली अभिमानाची जीवनधारा आहे आणि 35 हजार सायकलपटूंच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश प्रभावीपणे(River Cyclothan 2025 ) पोहोचेल.”
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, अविरत श्रमदान संस्था, सायकल मित्र, WTE फाऊंडेशन आणि महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला आहे. 5, 15 आणि 25 किमी अशा तीन वेगवेगळ्या ट्रॅकवर हजारो सायकलस्वारांनी सहभाग नोंदवला (River Cyclothan 2025)आहे.
आमदार महेश लांडगे म्हणाले,
“इंद्रायणी नदी ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. तिचे रक्षण आणि स्वच्छता ही आजची गरज आहे. ‘रिव्हर सायक्लोथॉन 2025’ मधील ‘शिव-शंभू यशोगाथा’ हा इतिहास, संस्कृती आणि पर्यावरणाचा संगम साधणारा उपक्रम आहे. सायक्लोथॉन यावर्षी ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’ला समर्पित करण्यात आला आहे. 35 हजारांहून अधिक नागरिक आणि सायकलपटूंचा सहभाग पाहता नदी संवर्धनाची चळवळ अधिक बळकट होणार याची मला पूर्ण खात्री (River Cyclothan 2025) आहे .”
