Home महाराष्ट्र Asha Bhosle Award:श्रेया घोषाल यांना २१ वा आशा भोसले पुरस्कार; ‘हा आयुष्यातील सर्वोच्च क्षण

Asha Bhosle Award:श्रेया घोषाल यांना २१ वा आशा भोसले पुरस्कार; ‘हा आयुष्यातील सर्वोच्च क्षण

आशा भोसले यांच्या नावाने दिला जाणारा २१ वा मानाचा पुरस्कार सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल यांना पिंपरी येथे प्रदान करण्यात आला.

by Admin
Spread the love

(पिंपरी, प्रतिनिधी ): भारतीय चित्रपटसृष्टीत आशाताई भोसले यांनी आपल्या अद्वितीय गायकीने अफाट आणि अद्भुत कामगिरी करून ठेवली आहे. त्यांच्या नावाने दिला जाणारा मानाचा पुरस्कार मिळणे हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च आणि अविस्मरणीय क्षण आहे, अशी भावनिक भावना सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल यांनी व्यक्त (Asha Bhosle Award)केली.

 

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड, क्लारंग प्रतिष्ठान आणि सिद्धिविनायक ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा २१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ हिंदी व मराठी संगीत क्षेत्रातील आघाडीच्या आणि प्रतिभावंत गायिका श्रेया घोषाल यांना आज पिंपरी येथे प्रदान करण्यात आला. रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि शाल देऊन श्रेया घोषाल यांचा गौरव करण्यात (Asha Bhosle Award)आला.

सत्काराला उत्तर देताना श्रेया घोषाल आशाताईंच्या आठवणी आणि त्यांच्या कार्याचा गौरव करत भावविभोर झाल्या. त्यांच्या मनोगताने सभागृहातील वातावरणही भावुक झाले. श्रेया यांच्या भावना ऐकताना उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करत त्यांना मानवंदना (Asha Bhosle Award)दिली.

 

“आशाताई भोसले यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे ही माझ्यासाठी केवळ सन्मानाची बाब नाही, तर मोठी जबाबदारी आहे. अशा पुरस्कारामुळे कलाकार म्हणून आपली जबाबदारी आणखी वाढते. ही जबाबदारी समर्थपणे पार पाडण्यासाठी मी भविष्यातही अथक प्रयत्न करत राहीन,” असे श्रेया घोषाल यांनी(Asha Bhosle Award) सांगितले.

आशाताईंच्या महानतेचा आवर्जून उल्लेख करत श्रेया यांनी त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. आशाताईंच्या नावाने मिळालेल्या पुरस्काराचा विशेष आनंद आणि अभिमान असल्याचे सांगताना त्यांनी आपल्या मनातील विनम्र भावनाही व्यक्त (Asha Bhosle Award)केल्या.

 

यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, विधानपरिषद आमदार अमित गोरखे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष व संयोजक, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी समयोचित मनोगते व्यक्त केली. ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, ज्येष्ठ व्यावसायिक कृष्णकुमार गोयल, गायिका वंदना घागुर्डे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती(Asha Bhosle Award) होती.

 

आशासे श्रेया’मधून संगीताचा सुरेल नजराणा

 

पुरस्कार वितरण सोहळ्यापूर्वी ‘आशासे श्रेया’ हा विशेष सांगीतिक कार्यक्रम रंगला. श्रेया घोषाल यांच्या सुरेल गायकीने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद (Asha Bhosle Award)लाभला.

 

या कार्यक्रमादरम्यान भाऊसाहेब भोईर यांच्या कन्या मानसी भोईर यांच्या आगामी प्रकल्पाचे अनावरणही श्रेया घोषाल यांच्या हस्ते करण्यात (Asha Bhosle Award)आले.

 

गच्च भरलेल्या सभागृहात झालेल्या या सोहळ्याला संगीतप्रेमींची मोठी उपस्थिती होती. श्रेया घोषाल यांच्या गौरवाच्या क्षणी सभागृहातील प्रत्येक रसिकाने उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दिलेली मानवंदना हा कार्यक्रमाचा विशेष भावनिक क्षण(Asha Bhosle Award) ठरला.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद बावा यांनी केले, तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ व्यावसायिक कृष्णकुमार गोयल यांनी (Asha Bhosle Award)केले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00